झी मराठी वरील अनेक मालिका लोकप्रिय ठरल्या आहेत त्यात वेगळी म्हणजे रात्रीस खेळ चाले ही मालिका, तशी कौटुंबिक पण एका वेगळ्या वळणावर नेणारी मालिका यात आपल्याला नाते, नात्यातील दुरावा, कपट, छळ, आरेरावी असे अनेक पैलू पाहायला मिळाले. एक वेगळं कथानक आणि वेगळी कहाणी असल्यामुळे लोकांना ही मालिका मनापासून आवडली आहे म्हणून इतक्या रात्री उशिरा लागून ही आणि रिपीट टेलिकास्ट नसूनही ही मालिका पाहायला लोकांना आवडले आहे.
या मालिकेचा पहिला सीजन खूप लोकप्रिय झाला होता. त्यानंतर त्यांनी दुसरा सिजन काढायचे ठरवले आणि दुसऱ्या शिजन मध्ये शेवंता या कॅरेक्टरची एन्ट्री झाली. पहिल्या शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकरला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम देले. दुसरे सुपरडुपर पात्र म्हणजे अण्णा एक भारदस्त व्यक्तीमत्व लोकांना खूप आवडले.
यात अन्नाचे रौद्ररूप आपल्याला पाहायला मिळाले पण खऱ्या आयुष्यात मात्र ते असे मुळीच नाही आहेत. त्याच्या सोबत असणारे दत्ता, माधव, पांडू, वच्छी हे पात्र सुधा प्रेक्षकांना खूप आवडले होते. म्हणायला गेलात तर यातील प्रत्येक पात्र हे अगदी उठावदारपणे आपले काम करत होते.
गूढ आणि थरार याने भरलेली ही मालिका सध्या अशा थरावर जाऊन पोहचली आहे की ती आपला निरोप घेणार आहे. म्हणजे मालिका आता आपला निरोप घेणार आहे पण त्या जागी झी ने नवीन मालिका आणली आहे.
असो प्रत्येक गोष्टीला शेवट हा असतोच त्याचप्रमाणे ह्या मालिकेचे ही आता हे दुसरे पर्व आणि ते आता संपुष्टात येणार आहे. तुम्हाला जाणून थोड वाईट वाटेल पण ही मालिका शनिवारी, २९ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या शेवटी ही अण्णा जगाचा निरोप घेताना दिसणार आहेत. ते आपण पाहूच या ही मालिका संपल्यानंतर त्या ठिकाणी एक दुसरी मालिका सुरू होणार आहे
ह्याच स्लॉट वर येणाऱ्या नवीन मालिकेचे नाव देवमाणूस आहे. याच वेळेला ही मालिका दाखवण्यात येणार आहे. ही मालिका सुधा एक थ्रिलर म्हणजे भीतीदायक असणार आहे. या मालिकेत असते मुख्य पात्र म्हणजे
शिवानी घाटके आणि किरण गायकवाड हे दोघे तुम्हाला दिसतील. ही मालिका सुद्धा नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल.
हे पण वाचा