सध्या लॉक डाऊन असल्यामुळे सिनेमाचे आणि मालिकांचे शुटींगही थांबले आणि आणि शुटींग थांबली असल्यामुळे चॅनल वाल्यांना आता काय दाखवायचे हा प्रश्न पडत असेल. त्यामुळे नवीन एपिसोड तयार झाले नसल्यामुळे झी मराठीने मराठी वेब सिरीज दाखवायला सुरुवात केली आहे
आताच झी मराठी ने आणि काय हवं ह्या वेब सिरिजचा एक प्रोमो प्रदर्शित केला आहे. उमेश आणि प्रिया बापटने ह्या सिरीज मध्ये अक्षरशः चार चांद लावले आहेत. झी मराठी एपिसोड प्रमाणे लॉक डाऊन काळात ही सिरीज दाखवणार आहे. ह्या सिरीज मध्ये काय असेल तर या सीरिज मध्ये सध्या तरी दोन सीजन आहेत आणि दोन्ही सीजन एकदम उत्तम आहेत. ऑनलाईन तुम्ही एम एक्स प्लेअरवर सुद्धा पाहू शकता.
ही सीरिज नवरा आणि बायको या दोघांच्या नात्यातील रोजच्या घडणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे त्याच्या जागी आपण आपल्याला पाहू शकतो. या सीरिज मध्ये तुम्हाला दोन कलाकार पाहायला मिळतील एक प्रिया बापट आणि उमेश कामत, हे खऱ्या आयुष्यात ही नवरा बायको आहेत. त्या दोघांची नाव जुई आणि साकेत अशी आहेत. त्यांचा अभिनय तर एकदम भन्नाट आहे. त्यांना स्क्रीनवर पाहताना असे वाटतं आपणच समोर आहोत. आपल्याच आयुष्यातील घडामोडी तिथे घडत आहेत. झी मराठी रात्री ९ वाजता ही मालिका प्रदर्शित करणार आहे. त्यामुळे ज्यांनी बघितली नसेल त्यांनी आवर्जून पहा, खूप छान आहे तुम्हालाही आवडेल. एक भाग पाहिल्यावर दुसरा भाग कधी एकदा पाहतोय असे होईल.
शिवाय याच्यासोबत पांडू ही वेब सीरिज सुद्धा झी मराठीवर पाहायला मिळणार आहे. ही वेब सीरिज आम्ही पहिली आहे. पोलिसांच्या आयुष्यातील एक वास्तव ह्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. झी मराठीवर चालू झाल्यावर तुम्ही आवर्जून ही सिरीज पाहा. पोलिसाच्या घरातील आणि कामातील अनेक अडचणींवर ही सीरिज भाष्य करते.