Home हेल्थ झंडू बाम लावल्यावर आग का होते माहीत आहे का?

झंडू बाम लावल्यावर आग का होते माहीत आहे का?

by Patiljee
2995 views

झंडू बाम झंडू बाम विघ्न हरी बाम ही जाहिरात तुम्हाला आठवत असेलच..! साधे डोके दुखत असेल किंवा आपल्याकडील लोक काहीही दुखले म्हणजे हात पाय किंवा पाठ तरी झंडू बाम लावतात. माहीत नाही पण कदाचित त्यांना त्यातून आराम मिळत असेल. हे बाम लावल्याने आपल्या शरीरावर एक प्रकारची जळजळ होते. हा दाह किंवा जळजळ झाल्यामुळे आपली चेता सस्था आपल्या शरीरावर नवीन निर्माण झालेल्या दाह कडे आपले लक्ष केंद्रित करते, आणि म्हणून आपल्याला पहिले दुखत असलेली जागा कमी दुखत असल्यासारखे वाटते. पण कदाचित आपल्या दुखण्यासाठी या बाम मधील काही घटक हे परिणाम कारक असतात.

पूर्वी बामची बाटली काचेची असायची, आणि फुल भरलेली असायची पण सध्या तिच्यात खूप बदल झालेला आहे, आता ती प्लास्टिकची आहे वरून जरी ती मोठी वाटत असली तरी आतून तिचा आकार खूप कमी केलेला आहे. तिच्यात खूप थोडे बाम असते. पण तरीही आपल्यापैकी बहुतेक लोकांना याची सवय झाली असल्यामुळे ते ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत.

त्यात कोणकोणते पदार्थ असतात तुम्हाला माहीत आहे का ? मग पाहूया आज हा बाम कोणकोणत्या पदार्थांपासून बनतो. हा बाम बनवण्यासाठी गंधपुरा तेल, तारपीन तेल, नीलगिरि तेल, पुदिन्याचे फूल, कापूर पाउडर, ओव्याचे फूल, जायफल तेल, हे दाह करणारे तेल असतात त्यामुळे आपल्या त्वचेवर हे लावल्यास आग होते.

काही लोक बाम वापरतात पण त्यांना एकप्रकारचे व्यसन लागलेले असते. काहींना तर हा बाम रोज लावायची सवय झालेली असते हे रोज बाम लावणे कधी कधी आपल्या शरीरासाठी धोक्याचे असू शकते. कारण बहुतेक बाम बनवणाऱ्या कंपन्या ह्या नैसर्गिक पदार्थांचा वापर फक्त नावापुरती करतात. त्यांच्या बाममध्ये फक्त कृत्रिम पदार्थ असतात त्यामुळे ह्या बामचा अतिरेक करणे ही चुकीचे आहे.

आपण रोज पुजा करताना देवाला कुंकू वापरतो पण हा बनवतात कसा माहीत आहे

असे बरेच प्रकारचे आणि कंपन्यांचे बाम सध्या मार्केट मध्ये मिळत आहेत त्यामुळे कोणता बाम योग्य आहे ते तुम्हीच ठरवा.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल