Home कथा योग्य जोडीदार

योग्य जोडीदार

by Patiljee
2529 views
जोडीदार

काय रे सुनील आजपण वैतागला आहेस, आज काय झालं परत तुला? (राहुलने गमतीतच विचारले) अरे काय तुला तर सर्व चांगले माहित आहे ना रे? आता माझे वय ३५ वर्ष झालं आहे आणि घरातले सर्वच लग्नाच्या असे मागे लागले आहेत जसे काय ह्या जगात मी एकटाच लग्न करायचा बाकी आहे. असे पण नाही की मी प्रयत्न करत नाही रे, मला सुद्धा वाटतं लग्न करावे पण करीयरच्या मागे लागलो त्यामुळे प्रेम करायला कधी जमलच नाही. आता जोडीदार हवा तर तो हो एकदम परफेक्ट म्हणून थोडा वेळ घेतोय. आजवर २० पेक्षा अनेक मुली पाहिल्या पण कुणीच आवडले नाही किंवा ज्या आवडल्या त्यांना मी आवडलो नाही.

बायको कशी मला शोभेल अशी असावी ना रे, चार चौघात शोभली पाहिजे मला. पण ह्या महिन्यात पाच मुली पाहिल्या त्यातील सर्वांनी काही ना काही कारण देऊन मला रिजेक्ट केलं. काय कारण आहे तेच कळत नाही मला. चांगल्या कंपनीमध्ये कामाला आहे, चांगला पगार आहे, घर आहे स्वतःच? अजुन एखाद्या मुलीला काय हवं आहे?

अरे हो हो सुनील शांत हो, किती हे मनात साठवून ठेवले आहेस. हे घे पाणी पी आणि इकडे बस पाहू. अरे राहुल काय सांगू तुला खूप त्रास होतोय रे, तुझेच बघ ना आपण इथे सोबत काम करतो, तुझ्या लग्नाला आता एवढी वर्ष झाली. पण नेहमी तू खुश असतोस. चांगले चांगले फोटोज् सोशल मीडियावर पोस्ट करत असतोस. तुमची जोडी खूप छान आहे. मला पण तुझ्या सारखीच फॅमिली हवी आहे रे.

अरे सुनील पण तू मागच्या रविवारी एक मुलगी पाहिली होतीस ना? तिचे काय झालं? अरे काय सांगू तुला पहिल्या भेटीत खूप छान वाटली एकदम मस्त, मनात घर करून गेली. तिच्या घरचे पण माझ्या घरी आले आमचे घर पाहून गेले. सर्व अगदी सुरळीत चालले होते. लग्नाची तारीख सुद्धा काढणार होतो पण एक दिवस तिने स्वतः फोन करून सांगितले की तिला एका कानाने कमी ऐकू येत. मग काय मला खूप राग आला. आमची फसवणूक केली रे त्यांनी. मग मीच तोडून टाकले ते स्थळ.

कसे असते ना सुन्या तू फक्त सध्या तुझ्याच बाजूने विचार करत आहेस. कधी हा विचार केला आहेस का की तुला मुली का नाही म्हणत आहेत? तुझ्याकडे तर सर्वच आहे मग का नकार मिळतोय तुला? कदाचित तुला ते माहीत असेल पण माहीत करून घ्यायचे नसेल. तुझे वय झाले आहे भावा आता. त्यामुळे कोणताही बाव आपली मुलगी अशा व्यक्तीला देणार नाही. त्यात तू कमी वयाच्या मुली पाहत आहेस. राहिला प्रश्न ज्या मुलीला तू नकार दिलास त्या मुलीचा तर मला तर वाटतं की तिने तुला सांगितले नसते की तिला एका कानाने कमी ऐकू येत तर तू हसत हसत लग्न केलं असतेस. पण त्या मुलीला ह्या नवीन नात्याची सुरुवात काही तुझ्यापासून लपवून करायची नव्हती.

म्हणून तिने न घाबरता तुला सर्व सांगून टाकले. आणि कसे असते ना कोणतीच व्यक्ती कधीही परफेक्ट नसते रे, ते आपण समजून घ्यायचे असते. तुला वाटत माझा संसार सुखाचा आहे, सर्व मला खूप चांगले मिळाले आहे. पण असे नाही रे. सुखाचा संसार तर माझा आहेच पण आम्ही दोघांनी मिळून तो संसार सुखाचा केला आहे. माझी बायको बोलू नाही शकत हे खूप कमी लोकांना माहीत आहे. तिच्यावर प्रेम करताना मला ते माहीत नव्हते पण प्रेम केल आणि मग मला कळले तिला बोलता येत नाही. तर मग मी तुला सोडू तर शकत नाही. प्रेम केलेय मी तिच्यावर. सर्व गोष्टी माहीत असून मी तिच्याशी लग्न केलं.

कारण मला माहीत आहे जरी तिला बोलता येत नसले तरी मला आयुष्यभर तीच मुलगी सांभाळून घेऊ शकते. खूप प्रेम आहे तिचे माझ्यावर त्यामुळे तिचे कसेही असणे नसणे ह्याचा विचार मी कधी केलाच नाही. कारण मला माझ्या आयुष्यात फक्त ती हवी होती आणि आता ती माझी जोडीदार आहे. आम्ही खूप खुश आहोत. त्यामुळे मला असेच वाटते की तू सुद्धा कुठेनाकुठे कमीपणा घे. ज्या मुलीला माहीत होत सत्य सांगून तू दूर जाणार तिच्यापासून तरी तिने सांगून टाकलं. अशीच मुलगी नेहमी तुला साथ देईल सुन्या नीट विचार कर.

राहुल तू किती ग्रेट आहेस यार आज तू माझे डोळे उघडून टाकलेस. मी किती चुकीचा विचार करत होतो. नाही नाही पण आता ही माझी चूक मी सुधारणार. थांब मी आताच तिला फोन करतो.

लेखक : पाटीलजी

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल