आजची पोस्ट ही चहा पिणाऱ्या शौकिनासाठी आहे. खरं तर आपण आज चहा पिण्याचे फायदे किंवा दुष्परिणाम हे सर्व पाहणार नाही आहोत तर आजची कहाणी काही वेगळीच आहे. कोणाला नाही आवडणार सकाळची सुरुवात ही मस्त पैकी सुगंधी चहाने म्हणजे मसाला घातलेल्या चहा ने व्हावी. जशी प्रत्येक प्रदेशात वेगवेगळ्या नावाने हा चहा विकला जातो त्याचप्रमाणे महाराष्ट्रात येवले चहा प्रसिद्ध आहे. या चहा ने कमी काळात अधिक मोठी उडी घेतली आहे. दहा रुपयात एका गरिबालाही परवडणारा हा चहा तोंडाला अगदी चव आणल्याशिवाय राहत नाही. हा चहा ज्या मालकाने बनवला ते मुलचे आस्करवडी येथील आहेत.

हा पुरंदर तालक्यातील दुष्काळाने ग्रस्त असा गाव. याच गावात यांच्या वडिलांनी दोन म्हशी विकत घेऊन आपला दुधाचा व्यवसाय चालू केला होता. या दुधाच्या व्यवसायात त्यांच्या अंगावर कर्ज झाले आणि ते उतरवण्यासाठी ते पुण्याला एका अमृततुल्य दुकानात कामाला लागले. आता ज्या चहाच्या दुकानात कामाला होते तिथूनच आपली कारकीर्द त्यांनी पुढे सुरू केली. यांनी योग्य ती युक्ती लढवली आणि पुण्यातील एम जी रोड येथे मित्राच्या सोबत राहून पहिला चहाचे दुकान सुरू केले. त्यानंतर हा चहा दोन रुपयाच्या दराने विकणे सुरू केले आणि या चहाचे नाव त्यांनी गणेश अमृततुल्य असे दिले.
त्याचवेळी या चहाचे मालक दशरथ हे 2001 साली देवाघरी गेले. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या अंगावर सुमारे आठ लाख रुपये कर्ज होते. त्यानंतर त्यांनी आपल्या कामावरील कामगार कमी केले आणि त्या दुकानात ते सर्व काम हे एकटे मालक करायचे. आणि यापुढे जाऊन त्यांनी आपल्या कामात खूप सुधारणा आणली आणि सर्व कर्ज फेडले आता त्यांचा अमृततुल्य चहा हा महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी मिळतो आणि लोक ही आवर्जून हा चहा पिण्यासाठी जातात. 10 रुपयात मिळणारा हा चहा पील्याने खरंच मनाला वेगळाच आनंद मिळतो. आम्ही येवले बद्दल अतिशय संशिप्तपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही अजुन काही त्यांच्याबाबत जाणून घेऊ शकता.
मित्रानो या मराठी माणसाची जिद्द आणि मेहनत पाहून तुमच्याही मनात अशीच मेहनत करण्याची इच्छा तयार व्हावी आणि तुम्ही तुम्हीही शून्यातून जग निर्माण करावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना.