लॉक डाऊन मुळे सर्व ट्रान्सपोर्ट बंद असल्याने लोक पायपीट करून आपापल्या गावी निघाले आहेत. अशीच एक बातमी समोर आली आहे ती म्हणजे फक्त १५ वर्षाच्या एका युवतीने अतिशय उष्ण तापमानात सुद्धा १२०० किमी प्रवास अवघ्या सात दिवसात आपल्या जख्मी वडिलांना घेऊन अंतर पार करून आपले गाव गाठले. ह्या मुलीचे नाव ज्योती कुमारी आहे आणि ती सध्या इंटरनेटवर वायरल झाली आहे. तिच्या ह्या धाडसाचे कौतुक खुद्द डोनाल्ड ट्रम्प ह्यांची कन्या एवांक ट्रम्प हिने सुद्धा आपल्या सोशल मीडियावरून पोस्ट करून केले आहेत.
तिचे वडील मोहन पासवान ह्यांना घेऊन तिने गुरुग्राम ते बिहार दरभंगा असा १२०० किमीचा प्रवास सायकलवर केला. सध्या ट्विटरवर ती #JyotiKumari म्हणून ट्रेण्ड करत आहे. आपल्या वडिलांना जख्मी असून सुद्धा स्वतःच्या घरी सुखरूप पोहोचल्यामुळे तिच्या कार्याचे नेटकऱ्यानी सुद्धा कौतुक केले आहे. तिच्या ह्याच कार्याला पाहून भारतीय सायकलिंग महासंघाचे अध्यक्ष वीएन सिंह ने तिला क्षमता वान ही उपाधी दिली आहे. त्यांनी असे सुद्धा म्हटलं की ज्योतीचे आम्ही सायकलिंग ट्रायल घेऊ. जर ती आमच्या नियमात थोडी तरी पास झाली तरी आम्ही तिला ट्रेनिंग आणि कोचिंग देऊ.
भारतात अजुन ह्या तरुण मुली बद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. तरीसुध्दा ईवांक ट्रम्प तिच्या ह्या कार्याची दखल घेतली. चालू जगातील तिला श्रवण कुमार म्हणून लोकं ओळखू लागले आहेत. अनेक कलाकारांनी, खेळाडूंनी आणि राजकारणी मंडळी ने तिचे कौतुक करत तिची व्हिडिओ शेअर सुद्धा केली आहे.