कुत्रा हा प्राणी जरी इमानदार असला तरी त्याचेही काही शुभ आणि अशुभ अनुभव तुम्हाला येत असतील. कुत्रा हा सकाळी भुंकत असतो पण रात्री रडतो. म्हणतात की रात्र झाल्यावर कुत्री नेहमीच रडत असतात पण ते का रडतात हे आपल्याला अजूनही माहीत नसेल. पण यामागे वेगवेगळ्या आपल्या समोर आली आहेत. रात्रीच्या वेळेस कोणताही कुत्रा येऊन तुमच्या घराच्या आसपास रडत असेल तर तुम्ही त्याला लगेच हाकलून लावता का कारण ते आपण अशुभ मानतो.

रात्रीच्या वेळेस आपल्या घराच्या आजूबाजूला कुत्रा रडत असेल तर कदाचित असेही असू शकेल की त्याला काही वाईट शक्तींचा अनुभव आला असेल आणि जोतिष शास्त्रामध्ये हे सत्य मानले आहे.
जेव्हा हे कुत्रे रात्री रडत असतात तेव्हा कधी कधी ते एकटे असतात किंवा भुकेले असतात आणि आपला हा संदेश ते इतर कुत्र्यांना देत असतात. यासाठी रात्री ते रडत असतात. जर कुत्रे हे पाळीव असतील तर कधी कधी मालकाच्या आठवणीने ते रडत असतात.
कुत्रा हा जेव्हा रात्री एकटा असतो तेव्हा तो स्वतःला असुरक्षित मानतो. पण त्याला एकटे राहायला अजिबात आवडत नाही आणि तो जेव्हा स्वतला एकटे समजतो तेव्हा तो रडत असतो.
कुत्रा हा ही आपल्यासारखा एक जीव आहे त्यामुळे कधीकधी त्यालाही आपल्या शरीरात होणाऱ्या बदल यांमुळे त्रास होत असेल त्यामुळे ते रात्री रडत असेल.