मित्रानो काही गोष्टी अशा असतात त्या ज्या ठिकाणी असणेच चांगली गोष्ट असू शकते. आपल्या शरीरातील ही अशाच काही जागा आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला तर इतकी कल्पना नसते. पण डॉक्टरांना आपल्या शरीरा बद्दल संपूर्ण माहिती असते. त्यामुळे आपल्याला कोणत्या आजारांवर कोणते औषध आणि इंजेक्शन कोणत्या ठिकाणी द्यायचे याची संपूर्ण कल्पना असते.
महत्वाचं म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जनांना कमरेवर इंजेक्शन घ्यायला आवडत असेल कारण ते घेताना आपल्याला समोर दिसत नाही आणि त्रास ही थोडा कमीच होतो. पण हातावर घेण्यासाठी थोडी भीती वाटते, शिवाय हातावर इंजेक्शन देताना थोडी काळजी ही घ्यावीच लागते. कारण कारण हातात असणाऱ्या नसाना चुकून अपाय होण्याची दाट शक्यता असते. आणि त्यामुळे बधीर पण येऊ शकतो.
आता तुम्ही म्हणाल काही इंजेक्शन हे कमरेवर का दिले जातात? तर इंजेक्शन घेण्यासाठी ती एक सुरक्षित जागा असते. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची रक्तवाहिनी नसते जेणेकरून तुम्ही घेतलेले इंजेक्शन तेथे असणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये न जाता आपल्याला कोणत्याही प्रकारचे अपाय होत नाहीत.
तस म्हणायला गेलो तर हे दोन्ही इंजेक्शन हे आपल्याला स्नायू मधून घेता येतात.
त्यामुळे बघायला गेलो तर हे दोन्ही प्रकारचे इंजेक्शन घेणे तसे कमी धोकादायक असतात पण जे इंजेक्शन तुम्हाला प्रत्यक्ष रित्या शिरेमधून द्यायचे असतात त्याने तुम्हाला फरक ही लगेच जाणवतो पण त्या इंजेक्शन ने कोणकोणत्या रिएक्शनची शक्यता ही जास्त असतात. अर्थातच चांगला तरबेज डॉक्टर असेल तर त्याच्याकडून कोणत्याही ठिकाणी इंजेक्शन घेणे सोईचे आहे. पण शिकाऊ डॉक्टर असेल तर यात थोडा धोका असतो. {हे सुद्धा वाचा : भारतीयांनी आपली ही सवय सोडली नाही तर भारतातून कधीच करोना हद्दपार होणार नाही}