गणपती आपल्या गावाला निघून गेल्यावर हा महिना चालू होतो या महिन्याला म्हणजे पांढरा दिवसाचा जो काळ असतो त्याला पितृ पंधरवडा असे म्हणतात. या महिन्यात आपल्या हिंदू धर्मात आपल्या पितरांच्या नावाने श्राद्ध घातले जाते. त्यांची आठवण त्यांनी केलेले कर्म आठवून त्यांना आवडणारी वस्तू खाद्यपदार्थ बनवून जे जेवण घालण्याची प्रथा पूर्वी पासून आपल्या धर्मात चालत आलेली आहे. आणि पुढे ही अशी च चालू राहील.
या काळात आपल्या पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी होईल तितके दानधर्म आपल्या हातून करावे.
जेवायला काय असावे कोणकोणत्या प्रकारचे जेवण असावे?
पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष होय. आपल्या नातेवाईकांचे या पांढरा दिवसात श्राद्ध घातले जाते. या पक्षात आपली गेलेली लोक पुन्हा परत येतात त्यामुळे या काळात त्यामुळे या आलेल्या पितरांना जेवण घालावे हे पुण्ण्याचे काम आहे.
याउलट काही जाती व राष्ट्रांमध्ये अशी कल्पना प्रचलित आढळते की पितर आप्तेष्टांशी व आपल्या माणसांशीही चांगल्या तऱ्हेने वागत नाहीत. त्यामुळे ज्या ज्या जातीची पितरांसंबंधींची जशी चांगली अगर वाईट कल्पना असेल त्या त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये पितृपूजेच्या विधींमध्ये फरक आढळतात.
कावळा हे मृत्यूचे संकेत देते असे म्हणतात शुभ आणि अशुभ अशा गोष्टी कावळ्याला लगेच कळतात असे म्हणतात. अशा वेळी कावळ्याने जर भोजन केले तर ते पुण्याचे काम मानले जाते. पण कावळ्याने जर अन्न ग्रहण नाही केले तर पुण्य मिळत नाही असे मानतात. मृत्यू नंतरचा पहिला जन्म हा कावळ्याच्या योनीत होतो असे म्हणतात. त्यामुळे कावळ्यांना जेवण म्हणजेच अन्न दिल्यानंतर ते पितरांना मिळते असा समज आहे.
हे पण वाचा