रसोडे मै कोन था? तुम थी, मै थी, कोन था? हे मिम्स सध्या एवढे वायरल झालं आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हेच पाहायला मिळत असेल. फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा हे मिम्स ट्रेडिंगवर आहे.
ह्या मिम्सला अनुसरून अनेक लोक आपल्या फिडमध्ये शेअर करत आपआपली प्रतिक्रिया देत आहेत. पण तुम्हाला हे माहीत आहे की जे मिम्स साँग ज्याने बनवले आहे तो एक मराठी मुलगा आहे. चकित झाला त ना? हो पण हे खरं आहे.
ह्या युट्यूबर रॅपर चे नाव यशराज मुखाते आहे. आणि गर्वाची बाब म्हणजे तो मराठमोळा आहे. आपल्या महाराष्ट्रात असंख्य असे कलाकार आहेत जे खूप गुणी आहेत. फक्त संधी मिळत नाही. पण यशराज ने रातोरात आपले नशीब बदलले.
ही नॉर्मल व्हिडिओ त्याने फेसबुकवर एका पेजवर पाहिली. तेव्हाच त्याला आयडिया आली की ह्यात आपण संगीत टाकून काही मजेदार करू शकतो. कारण त्याच्या मते कोकिळा बैन ह्यांचा आवाज एक वेगळ्या धाटणीचा आहे. त्यांची बोलण्याची पद्धत सुद्धा खूप वेगळी आहे. साठी निभाना साथी या ह्या मालिकेचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. त्यामुळे एक मिम्स खूप लोकांना आवडलं.
ह्या एका मिम्सने तो रातोरात इंटरनेट क्षेत्रात वायरल झाला. स्वतः कोकिळा बैन ह्यांना सुद्धा हा व्हिडिओ खूप आवडला. त्याने यशराजला फोन करून त्याचा कामाची प्रशंसा केली. अनेक सेलेब्रिटी हा व्हिडिओ आपल्या फिडवर शेअर करून त्याच्या कामाची दखल घेतली.
बिबिसी मराठीला दिलेल्या एका इंटरव्ह्यू मध्ये त्याने असे सांगितले की नेहमी लोकांना वायरल जाताना बघत आलोय पण नक्की वायरल झालो की काय अनुभवता येतं हे आज पाहिले देखील. अनेक मेसेज आलेत आणि ते मी रोज वाचतोय पण संपत नाहीयेत. त्यात एक खास मेसेज होता तो म्हणजे अनुराग कश्यप ह्यांचा.
त्यांनी माझ्या कामाची दखल घेतली आणि मला सांगितले की तुझे काम खूप छान आहे. सोबत नक्कीच आपण काहीतरी करूया.
त्याच्या ह्या एका मिम्स मुळे त्याचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रसोडे मै कोन था? हे मिम्स डोक्यावरून उतरत नाही तोच आता १८०० रुपयाचे काकुंचे व्हिडिओ वायरल झाले आहे. काय वाटतं तुम्हाला त्या काकुबद्दल आणि यशराज बद्दल सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा.