Home संग्रह कोण आहेत पाटीलजी?

कोण आहेत पाटीलजी?

by Patiljee
5818 views
पाटीलजी

पाटीलजी म्हणजे नक्की आहेत तरी कोण? मुलगा की मुलगी? खरं नाव काय आहे? कोण आहात तुम्ही? कसे दिसता? काय करता? कुठे राहता? हे पेज कसे चालवता? पाटीलजी हेच नाव का सुचले? ऑनलाईन किती पैसे कमावता? असे असंख्य प्रश्न तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्स मध्ये, इनबॉक्स मध्ये, एवढेच काय तर मेल मध्ये सुद्धा विचारले आहेत. आज तुम्हाला ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे ह्या आर्टिकल मध्ये मिळतील.

कोण आहेत पाटीलजी?

सोशल मीडियाच्या ह्या अथांग पसरलेल्या समुद्रात पाटीलजी हे आपले छोटेसे कुटुंब. ज्यात तुम्ही मला नेहमीच साथ दिलीत म्हणून आज आपण इथवर पोहोचलो आहोत. माझे नाव महेंद्र गुरुनाथ पाटील आहे आणि मी छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे ह्या छोट्याश्या खेडेगावातील एक युवक. माझे वय २७ आहे आणि गेली आठ वर्ष मी फेसबुक वर पाटीलजी ह्या नावाने पेज चालवत आहे.

माझ्या बाबतीत अजून काही जास्त माहिती द्यायची झाली तर मी एम ए केला आहे तो इतिहासात. काहींना हे नक्कीच विचित्र वाटेल की इतिहास म्हणजे ते राजे, त्या तारखा, झालेले युद्ध लक्षात ठेवण्याचा विषय पण खरं सांगू माझ्या विचारांनी पाहिले तर इतिहासासारखा दुसरा प्रेमळ विषय नाही. मला हा विषय लहानपापासूनच आवडत होता, ज्या राजांनी, ज्या योध्यानी आपल्या देशासाठी आपलं रक्त सांडवल, आपल्या प्राणाची आहुती दिली असा विषय अभ्यासताना जगण्याची एक नवी उमेद मिळते. म्हणून ह्यातच मी एम ए करण्याचा निर्णय घेतला होता.

आधीपासूनच मला लिखाणाची आणि विनोद निर्मिती करायची आवड होती. शाळेत असताना मी स्वतः काही ना काही लिहून ते वर्गातील मुलांसमोर सादर करायचो. मुलांना ते सर्व एवढे आवडायचे की सर्वच म्हणायचे कसे सुचते रे तुला हे? पण तेच लिखाण मी आता वाचताना असे वाटते किती स्टूपिड लिखाण करायचो मी तेव्हा? पण तरीही दाद मिळायची.

मग काय तिच लिखाणाची आवड पुढे आणली. अभ्यासापाठोपाठ लिखाण ही चालूच ठेवलं. काही ना काही लिहिने चालूच असायचे मग त्यात कथा, प्रवास वर्णन, प्रोजेक्ट नी अजून बरच काही होतं. तेव्हा सोशल मीडिया मध्ये एक नवीन नाव चर्चेत आलं होतं ते म्हणजे फेसबुक. आधी ही भानगड काय आहे माहित सुद्धा नव्हतं पण जेव्हा कळलं की घरी बसल्या बसल्या आपण फेसबुक मार्फत असंख्य लोकांपर्यत पोहोचू शकतो तेव्हा मी ह्या क्षेत्रात पाऊल ठेऊन माझे फेसबुक आयडी तयार केलं.

पाटीलजी

पण नंतर कळलं की अकाउंट बनवून फक्त आपले मित्र मैत्रिणी आपण टाकलेली पोस्ट वाचू शकतात. बाकी इतर कुणी नाही. त्यावेळी मी प्रेमकथा लिहली होती. ती कथा एवढी छान होती की कधी वेळ मिळेल तेव्हा मी स्वतः पुन्हा पुन्हा वाचत बसायचो. आणि मला हे माहीत होत की मी ही कथा फेसबुकवर पोस्ट केली तर खूप लोकांना आवडेलही. त्यासाठी मी फेसबुकवर मराठी मधील तेव्हाचे एक नावाजलेले चांगले फोल्लोवर असलेले पेज शोधून काढले.

मी आता त्या पेजचे नाव नाही सांगत पण पेज छान होते पण फरक एवढाच होता की लोकांचे कंटेंट ते पेज आपल्या प्रोफाईलवर शेअर करत होते. मी त्या पेजच्या एडमीन सोबत कॉन्टॅक्ट केला आणि त्याला माझी प्रेमकथा पोस्ट करायला सांगितली पण त्याने पोस्ट करण्यासाठी नकार दिला. एका पोस्ट साठी १०० रुपयाची मागणी केली. तेव्हा मी सुद्धा शिक्षण घेत होतो आणि घरातली परिस्थिती एवढी चांगली नव्हती की मी त्याला १०० देऊ शकेल. म्हणून मी कसेबसे ५० रुपये जमा केले आणि पोस्ट करण्यासाठी त्या पेज एडमिनला खूप विनवणी केली पण त्याने माझे ऐकलेच नाही. अक्षरशः उडवून लावले मला.

ती गोष्ट मला खूप जास्त लागली. मराठी माणूस असून सुद्धा ती व्यक्ती मला मदत करत नव्हती. फक्त त्याला माझी कथा पोस्ट करायची होती. त्यालाही कंटेंट मिळाला असता आणि माझीही कथा पोस्ट झाली असती पण त्याने स्पष्ट नकार दिला. मग काय मी ह्याच रागात एक फेसबुक पेज तयार केले. मी लिहलेल्या कथा, चारोळ्या त्या पेजवर पोस्ट करायला सुरुवात केली. आधी हवा तसा रिस्पॉन्स मिळाला नाही पण नंतर नंतर ५०, कधी १०० तर कधी ५०० लाईक्स पोस्टवर येऊ लागले.

पहिल्या एक वर्षात फक्त ३ हजार लोक मला जोडले गेले होते. पण मी टाकलेल्या पोस्ट ना ते चांगले रिस्पॉन्स करत होतें हे पाहून खूप छान वाटत होतं. तेव्हा मी एक बाबांवर कथा पोस्ट केली होती. ती कथा एवढी वायरल गेली की काहीच महिन्यात माझ्या पेजचे आधी पन्नास हजार मग एक लाख सभासद पूर्ण झाले. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण होता हा, मी खूप जास्त खुश होतो. कुठेतरी माझ्या कामाची पोचपावती मला मिळाली होती. मग काय तेव्हापासून सुरू झालेला हा प्रवास आजही तसाच चालू आहे.

ज्या फेसबुक पेजने माझी कथा पोस्ट करण्यासाठी नकार दिला होता, आज तोच पेज मालक त्याच्या पेजवरील व्हिडियो व्ह्यू वाढवण्यासाठी मला पैसे देऊन लिंक शेअर करायला सांगत आहे. ह्यालाच तर कर्मा म्हणतात.

काहींना हा प्रश्न पडला असेल की फेसबुक पेजचे नाव पाटीलजी हेच का ठेवलं आहे? तर त्या मागे खूप मोठी कथा आहे. इथे क्लिक करून तुम्ही ती वाचू शकता.

पाटीलजी हेच नाव का दिलं ती कथा इथे क्लिक करून वाचा

माझे पाटीलजी फेसबुक पेज व्यतिरिक्त अजून २२ पेज (All Over 3M Followers) आहेत. चार वेबसाईट, एक मराठी कथा अँप आणि इतर सोशल अकाउंट सुद्धा आहेत. बरेच लोक मला म्हणतात की तुम्ही एवढे सर्व कसे सांभाळता? एवढे सर्व मी सांभाळतो कारण मला ह्या गोष्टीची आवड आहे. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड असेल तर तुम्ही ते करताना कधीच थकणार नाही.

ह्या ऑनलाईन दुनियेत तुम्ही सुद्धा पैसे कमावू शकता जसे मी कमावतो. त्यासाठी मी लिहिलेले हे आर्टिकल वाचा म्हणजे तुम्हाला कळेल की ऑनलाईन कसे पैसे कमावतात.

ऑनलाईन घरी बसल्या फेसबुक वरून कसे पैसे कमावू शकता?

पाटीलजी तुम्ही कसे दिसता?

सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणून ह्या प्रश्नाची नोंद माझ्या इनबॉक्स मध्ये असेल. तुम्ही कसे दिसता आम्हाला तुम्हाला पाहायचे आहे असे नेहमीच मेसेज मला येत राहतात. पण माझे एकच म्हणणे असते की मला माझ्या चेहऱ्यापेक्षा माझ्या कामाने ओळख हवी आहे. आणि पाटीलजी नक्की कसे दिसतात हे खूप कमी लोकांना माहित आहे. पण आज मी ह्या गोष्टीवरून पडदा उचलतो आहे.

माझा फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

२०१२ ते २०२० असा सुखद करणार पाटीलजी फेसबुक प्रवास. ह्या प्रवासात कधी आठ वर्ष सरळी कळलं सुद्धा नाही. मागे वळून पाहताना खूप सारे अपयश मग अपयशातून मिळालेलं यश आठवले की नेहमीच मनाला वाटतं की या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिध्दी, प्रगती आणि कुटुंब अशा अनेक गोष्टी प्राप्त झाल्या. डोळ्याचे प्रारणे फेडणारा हा प्रवास चिरंतर असाच चालू राहुदे आणि हे पाटीलजी कुटुंब नेहमीच माझ्या पाठीशी असेच खंबीरपणे उभे असुदे हीच बाप्पा जवळ प्रार्थना आहे.

आपले ऑफिसिअल संकेतस्थळ

तुमचा पाटीलजी.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल