भारतात अनेक अशी युवा पिढी आहे जी काहीतरी करून दाखवून आपले नाव जगासमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पण सर्वच यात यशस्वी होतात असे नाही तर काही आपल्या मेहनतीने जिद्दीने परिश्रमाने यशस्वी होतात तर काही हे सर्व असून सुद्धा प्लॅटफॉर्म भेटत नाही म्हणून मागे राहतात. छोट्या शहरातून असलेली युवा पिढी टॅलेंटड तर आहे पण त्या भागात हवी तशी सुविधा नसल्याने त्यांचे हे टॅलेंट कुठेतरी लपून राहतं.
सध्या सोशल मीडिया असल्याने छोट्या भागातील लोकांना सुद्धा आपली कला लोकांसमोर ठेवण्यासाठी एक मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. जर तुमच्या अंगात कोणतीही कला असेल आणि त्यात काही वेगळेपण असेल तर नक्कीच सोशल मीडिया मार्फत तुम्ही वायरल होऊ शकता. अशाच प्रकारची घटना दीपक सिंगाड ह्या तरूनासोबत घडली. टिक टॉकवर ह्या तरुणाने अक्षरशः आपल्या डान्स ने धुमाकूळ घातला आहे.
पण ह्या तरुणाचे नाव दीपक सिंगाड नसून उदयसिंग साल्हेर आहे. उदयसिंगचे टॅलेंट पाहून दीपक ने त्याचे व्हिडिओ तयार करून आपल्या चॅनेलवर पोस्ट केले. अत्यंत कमी वेळात हे व्हिडिओ वायरल झाले पण व्हिडिओ मध्ये जे नाव दिसते ते त्याचे नाव नाहीये हे खूप कमी लोकांना माहिती आहे. उदयसिंग नेहमीच तुम्हाला मळक्या कपड्यात डान्स करताना दिसतो. काही लोकांचे असेही म्हणणे आहे की व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी तो मुद्दाम असे करतो. पण असे नाहीये मित्रानो तो खरंच गरीब आहे. त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर गरिबीचे सावट आले.

तो आणि त्याची आई मौल मजुरी करून आपले घर चालवतात. त्याने डान्स कुठूनही न शिकता फक्त ऑनलाईन पाहून डान्स शिकला आहे. सध्या तो व्हिडिओ पोस्ट करत असलेल्या चॅनेलवर ८ लाखाहून अधिक लोक त्याला जोडले गेले आहेत. अनेक मोठं मोठे स्टार त्याच्या कलेचे चाहते झाले आहेत. खूप स्टारनी त्याच्यासोबत ड्यूएट व्हिडिओ सुद्धा तयार केले आहेत.
पण उदयसिंगला सर्वात मोठी संधी टेरेन्स लुईस ह्यांनी दिली आहे. त्यांनी त्याला इंडियाज बेस्ट डान्सर सिझन दोन साठी डायरेक्ट ऑडिशनसाठी निवड केली आहे. त्यामुळे लवकरच उदयसिंह आपल्याला छोट्या पडद्यावर दिसणार. रेमो डिसुझा, वैभव घुगे, फैजल खान, जय भानुशाली, सूरज पाल सिंह, लक्ष्मी गर वाल, समीक्षा सूड, अशा अनेक सेलेब्रिटीने त्याच्या कामाचे कौतुक केलं आहे.