कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगातील सर्वच शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत घेऊन उपचार शोधत आहेत. काही दिवसापासून अनेक कंपनीने दावा केला आहे की आम्ही कोरोनावर औषध शोधून काढले आहे. त्यातच रामदेव बाबा ह्यांची कंपनी पंतजली ह्यांनी सुद्धा आज पत्रकार परिषद घेऊन कोरोनावर औषध शोधून काढलं आहे असा दावा केला आहे. ह्या पत्रकार परिषदेत आचार्य बालकृष्ण ह्यांनी निम्स यूनिवर्सिटीचे चांसलर आणि संस्थापक डॉ. प्रो. बलवीर सिंह तोमर ह्यांना सुद्धा ह्या औषध निर्मितीत मोठे श्रेय दिले आहे.
कोण आहेत बलवीर सिंह तोमर (Balveer Singh Tomar)?डॉक्टर तोमर हे मॉडर्न मेडिकल सायन्सची प्रतिष्ठित संस्था निम्स यूनिवर्सिटी राजस्थानचे चांसलर, संस्थापक आणि सर्वेसर्वा आहेत. पतंजली सोबत हे औषध बनवताना त्यांनी आपल्या संस्थेतील प्रतिष्ठित लोकांना ह्यात सामावून घेतले आणि स्वतः सुद्धा ह्यात काम करताना जीव ओतून काम केलं आहे. त्यांनी किंग्स कॉलेज हास्पिटल स्कूल ऑफ मेडिसिन लंडन मधून आपले शिक्षण पूर्ण केलं आहे.
त्यांनी काही वेळ तिथेच लंडन मध्ये काम सुद्धा केलं. हावर्ड युनिव्हर्सिटी मध्ये सुद्धा त्यांनी काम केलं आहे. लहान मुलांच्या संगोपनाच्या अनेक योजनेत त्यांनी WHO सोबत काम केलं आहे. त्यांना ह्या क्षेत्रात ३६ वर्षाचा अनुभव आहे. त्यांना आपल्या ह्या कारकिर्दी साठी अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ह्यात प्रतिष्ठित राजीव गांधी अवॉर्ड, कॉमन वेल्थ मेडिकलची उपाधी त्यांना मिळाली आहे.
३० वर्षापासून होते इंग्रजी विषयाचे शिक्षक, पण आता करावी लागत आहे मजुरी
बाबा रामदेव ह्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत असे म्हटले आहे की आम्हाला गर्व आहे की आम्ही कोरोनावर पहिले आयुर्वेदिक औषध तयार केले आहे. मागील सात दिवसात आम्ही ज्या ज्या कारोना रुग्णावर उपचार केले ते सर्व बरे झाले आहेत. म्हणजे ह्या औषधाचा १०० टक्के रिझल्ट समोर आला आहे. ह्या औषधाचे नाव आम्ही कोरोनील (Coronil) ठेवलं आहे.
येणाऱ्या काही दिवसात हे औषध लोकांसाठी कितपत योग्य आणि गुणकारी आहे हे समोर येईलच पण तुम्हाला औषधाबद्दल काय वाटतं? आम्हाला नक्की कळवा.