Home बातमी या महिन्यात पाळला जातो एक आगळावेगळा ट्रेंड, हा महिना असतो नो शेव नोव्हेंबर..!!

या महिन्यात पाळला जातो एक आगळावेगळा ट्रेंड, हा महिना असतो नो शेव नोव्हेंबर..!!

by Patiljee
924 views

ऐकून आश्चर्य वाटले ना ..?? याविषयी कधी ऐकले का.?
नो शेव नोव्हेंबर आता 2020 च्या उंबरठ्यावर जागतिक ट्रेंड होऊन बसला आहे,चला तर मग जाणून घेऊया या आगळ्यावेगळ्या ट्रेंड विषयी.. सोशल मीडियावर लोक अनेक प्रकारच्या पोस्ट टाकताना दिसत आहेत , अनेक विनोदी पोस्ट ही पाहायला मीळत असतात.. आपल्या भारतात मात्र असे काही केले जात नव्हते ही पद्धत पाश्चिमात्य देशांमध्ये पाळली जात होती. मात्र आता हळूहळू भारतात ही याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.

भरपूर मुलं लहान दिसतात त्यामुळे त्यांना बाहेरचे लोक सल्ला सुद्धा देतात की तू दाढी आणि मिशी राहू दे म्हणजे मोठ्या व्यक्तीप्रमाणे देशील उत्साहाने आणि आत्मविश्वासाने प्रत्येक व्यक्तीला बोलशील. त्यामुळे तू तुझी दाढी आणि मिशी वाढ होते असे मोफत चे सल्ले समाजामधील भरपूर लोक एक दुसऱ्यांना देत असतात.
एक दुसऱ्यांचा ऐकून सुद्धा खूप जण आला वाटतं की आपली स्वतःची दाढी ठेवली पाहिजे. मात्र तुम्हाला माहीत आहेत का ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ बरोबर ‘मोव्हेंबर’ नावानंही एक खास मोहीम चालवली जाते. आपल्याकडे देवधर्म म्हणून असे काही सांगितले तर आपण डोळे झाकून करू नाही का..??

दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात ही मोहीम राबविण्यात येते. आता या मोहिमेचा प्रचार आणि प्रसार जगभरात झाला आहे. याची संकल्पना 2003 मध्ये ठेवण्यात आली त्यानंतर 2004 पासून यावर काम सुरू केले गेले.
पद्धत न म्हणता या प्रकारे केस न कापता कॅन्सरग्रस्त लोकांसाठी मदत म्हणून सामाजिक जागृती पसरवण्याचा हा प्रयत्न असतो. महिनाभरात शेव आणि कटिंग न करता उरलेल्या पैशातून कॅन्सरग्रस्त लोकांना मदत करायची असा या मागचा निर्मळ हेतू असतो.

गेल्या अनेक वर्षांपासून ही मोहीम सुरू असून, त्यामागचा उद्देश वेगळा आहे. दरवर्षी लोकं मोठ्या उत्साहात यात सामील होतात. आणि महत्वाचे म्हणजे आपापल्या इच्छेने मदतही करतात, आशा प्रकारे अनेक रूग्णांना मदत केली जाते. यात सहभागी होण्यासाठी काही नियम आहेत जसे की 30 दिवसांसाठी म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात रेझर खाली ठेवून घ्यायचा, त्याचा वापर एक महिना करायचा नाही.. आणि गमंत म्हणजे अनेकदा कामाच्या ठिकाणी अव्यवस्थीत राहील्यास सुनावले जाते मात्र सगळीकडे याचा प्रसार झाल्याने आता नोव्हेंबर महिन्यात तुम्ही अव्यवस्थीत जरी उपस्थित झलात तरी हरकत नसते.

प्रोस्टेट कॅन्सर, टेस्टीक्युलर, आणि त्यातून घडणारे सुसाईडबद्दल जनजागृती करणं हा यामागचा उद्देश आहे. प्रोस्टेट कर्करोग हा पुरुषांमधील मूत्राशयाच्या खाली असलेल्या पौरुष ग्रंथीचा कर्करोग होय. ही ग्रंथी वीर्य निर्माण करते. या ग्रंथीमध्ये काही समस्या निर्माण झाल्यास वेळोवेळी लघवीला जाण्याची इच्छा होते. वेळीच उपचार न केल्यास प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता वाढते. याविषयी आधी फारच कमी प्रमाणात जागरुकता होती, आणि महत्त्वाचे म्हणजे शरमेने बरेच लोकं याविषयी बोलणे टाळतात, मोकळेपणाने यावर बोलले जात नसल्याने मात्र गैरसमज वाढतात, या गंभीर विषयावर जनजागृती करन्याचे काम मोव्हेंबर फौंडेशन एक चॅरिटी इव्हेंट करत असते यात कॅन्सरग्रस्त लोकांना मदत केली जाते.

त्यात सहभागी झालेल्या सर्व पुरुषांच्या फॅमिली बॅकग्राऊंड विषयी माहिती घेऊन त्यांना भविष्यात असलेल्या धोक्याचा ही विचार केला जातो.यातून निरोगी आयुष्यसाठी उपाय सांगितले जातात. कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी महिनाभर दाढी करायची नाही आणि ते वाचलेले पैसे या रुग्णांसाठी द्यायचे हा या मोहिमेमागचा उद्देश आहे. चेहऱ्यावरील दाढीचे केस महिन्याभरासाठी वाढू देऊन प्रतीकात्मकरीत्या कॅन्सरच्या रुग्णांबद्दल सहानभुती व्यक्त करण्याचा हा एक आगळावेगळा प्रयत्न आहे.

मॅथ्यू हिल फौंडेशन या नावाने सुरवात केलेले हे फौंडेशन आता जगभरात प्रसिद्ध झाले आहे. मॅथ्यू हिल नावाच्या एका व्यक्तीला कॅन्सरने ग्रस्त केले होते, यातच त्याचा मृत्यू ही झाला , त्यानंतर त्यांच्या मुलांनी कॅन्सरग्रस्त रुग्णासाठी काहीतरी करायचे ठरवले यातूनच या संकल्पनेचा जन्म झाला. आधी तर स्थानिक पातळीवर राबविण्यात येणारि ही संकल्पना आता मात्र जागतिक स्तरावर गाजत आहे.लोकं या संकल्पनेचं स्वागत करत आनंदाने यात सहभागी होत आहेत.

कर्करोग झालेल्या रुग्णाचे केस गळतात. त्यामुळे आपण केस वाढवून, दाढी न करता पैसे वाचवून ते कॅन्सरग्रस्तांसाठी आणि पुरुषांना होणाऱ्या आजारांसंदर्भात काम करणाऱ्या संस्थाना द्यायचे या हेतूनं ही मोहीम राबवली जाते. नो शेव्ह नोव्हेंबर म्हणून जी मोहीम राबवली जाते. नो शेव्ह नोव्हेंबर हा फक्त एक व्हायरल ट्रेंड नसून ती एक सामाजिक बांधिलकी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नुझीलंड आणि ऑष्ट्रेलिया मध्ये मुख्यतः ही मोहीम राबविण्यात येऊ लागल्यावर हळुहळु बाजूच्या देशांमध्ये याचा प्रसार होऊ लागला.2012 मधे ग्लोबल जर्नल ने ही मोहीम जगातल्या टॉप 100 अशासकीय संस्थांमधील आहे असे सांगितले तेव्हा पासून मोठ्या प्रमाणावर या विषयी जनजागृती झाली.

त्यांनतर लोक मोठ्या उत्साहात यात सहभागी होतात. फक्त पुरुषच नाही तर महिलाही आपल्या परीने वेगवेगळ्या प्रकारच्या कॅम्पिंगन मधून मदत करू शकतात.
पण अनेकजण व्हायरल ट्रेंड म्हणून नोव्हेंबर महिन्यात दाढी करत नाहीत. जी काही समाजसेवा यातून केली जाते त्यातून कोणत्याही प्रकारे अर्निंग केली जात नाही आलेला सर्व पैसा हा कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी दान केला जातो. याविषयी आता सगळ्याच देशामध्ये प्रसार झाल्याने लोक मोठ्या उत्साहात यात सहभागी होताना दिसतात, नोव्हेंबर चा पहिला आठवडा जाताच सोशल मीडियावर अनेक ट्रेंड दिसू लागतात, यात फक्त कटिंग नाहींतर शरिरावरच्या केसांना हटवण्यासाठी आपण जे काही पैसे खर्च करतो ते पैसे दान करणे म्हणजे नो शेव नोव्हेंबर मध्ये भाग घेणे.

क्लीनशेव ही सध्याची फॅशन आसली तरी. फॅशनच्या नावाखाली दाढी न करणे हा सुद्धा एक फायदा असू शकतो. खरं तर दाढी वाढवण्याचे ही अनेक फायदे आहेत, दाढी म्हणजेच चेहऱ्यावर नैसर्गिक आवरण असते जे की व्हायरल इन्फेक्शन म्हणजेच सर्दी थंडी यांपासून वाचवते, शिवाय आकर्षक दाढी ठेवल्याने पुरुष रुबाबदार आणि आकर्षक दिसतात. अनेक प्रकारे याचा फायदा होतो, त्वचेवर डायरेक्ट पडणारा सूर्यप्रकाश आपल्या त्वचेला हानी पोहोचवू शकतो, खरं तर शरीरावर केसांचे आवरण ही निसर्गाचीच देणगी आहे. यातून आपल्या त्वचेचे रक्षण होते. जेव्हा आपण तर आवरण नाहीसे करतो तेव्हा आपण नैसर्गिक आवरण काढून टाकत असतो म्हणजेच आपल्या त्वचेला यातून संसर्ग होण्याचा धोका अधिक वाढतो.

भारतात दाढीची रूढी धर्माज्ञा म्हणून दिसत नसली, तरी मिशा राखण्याची चाल मात्र परंपरागत आहे. पूर्वी भारतीय ऋषिमुनी दाढीमिशा व जटा राखत असत. तसेच सिंधुसंस्कृतिकालीन पुरुषवर्गात मिशा राखण्याची प्रथा नसली, तरी विशिष्ट प्रकारे कापलेली दाढी ते राखीत. आपल्या भारतात ही दर वर्षी श्रावण महिन्यात देवाच्या साधनेकरिता केस कापत नाहीत अशी पद्धत आहे, अनेक लोकं ही पळताना दिसतात , अशीच नो शेव नोव्हेंबर सारखाच नो शेव श्रावण असाही ट्रेंड आपल्याकडे होऊ शकतो नाही का..?? यातून जनजागृती बरोबरच अनेक कॅन्सरग्रस्त रुग्णांना त्यांच्या उपचारासाठी मदतीचा हात मिळू शकतो नाही का.

आपल्याकडे ही असे अनेक उपक्रम राबवता येऊच शकतात मात्र यात लोकांचा मनमोकळा सहभाग मिळेल हा ही प्रश्नच आहे. आपल्याकडे सामाजिक बांधिलकी असते की नाही हा मुद्दा नाही मात्र सामाजीक उपक्रमात लोक तितक्याच उत्साहात सहभागी झाले तर सोन्याहून पिवळे नाही का..?? भारतात अनेक देवाच्या नावाखाली अनेक रूढी परंपरा आहेत मात्र समाज सेवेसाठी जास्त उपक्रम राबताना लोक दिसत माहीत ही शोकांतिका…!! असो मात्र तुम्हाला यात सहभागी व्हायचे असेल तर नक्की होऊ शकता, एका महिनाभरात आपण वाचवलेले पैसे मदत म्हणून देऊन ही मोठी सामाजिक बांधिलकी जपता येईल.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल