आताची परिस्थिती लक्षात घेता खूप दिवस झालेत घरातच बसून आहे आणि बाहेर कुठेही जात नाही माझ्या सारखेच सर्वाचे झाले असेल ना? माझ्या बायकोने घरात किती जरी मस्त आणि चमचमीत जेवण केले तरी बाहेरचे खाण्याची माझी आवड काही कमी होत नाही. कामावर असतानाही बाहेरचे थोडे तरी खाले जायचे, बायको कितीही नका खाऊ म्हटली तरी मी खाल्याशिवाय राहत नाही. ती कुठे असते मला बाहेर पाहायला मी खातो की नाही ते? जास्त करून वडापाव, पॅटीस आणि कांदा भजी त्याच्यासोबत एक चहा असला की झाली माझी मेजवानी पण तरीही त्यातल्या त्यात तोंडी लावायला मिरची ही हवीच.
आठ दिवस झाले बायकोने वडे बनवले होते म्हणजे बटाटे वडे, पण त्याच्यासोबत खायला पाव नव्हते ब्रेड होते. आता वड्यासोबत कोणी ब्रेड खातो का? या सगळ्यामुळे मला बाहेरच्या त्या हात गाड्यांची खूप आठवण सध्या तरी येते आहे कारण तेथील पदार्थांची चव फाईव स्टार हॉटेल मध्येही सापडणार नाही. हॉटेल मध्ये गेल्यावर मला मसाला डोसा हा साऊथ इंडियन पदार्थ खायला खूप म्हणजे खूप जास्त आवडतो. त्यातील ती बटाटा भाजी आणि त्याच्यासोबत मिळणारी घट्ट खोबऱ्याची चटणी वां… किती छान अजूनही आठवले की तोंडात आपोआप पाण्याच्या धारा सुटतात.
काही लोकांना मेंदू वडा खायला आवडतो तर जास्त लोकांना इडली सांबार खायला खूप आवडते. अजुन एक पदार्थ तो म्हणजे पाव भाजी. आता पावभाजी म्हटलं की ती बटर पावभाजी अहा हा अजूनही तो सुगंध नाकातच आहे. वरून बारीक कापलेला कांदा आणि एक लिंबाची फोड आणि थोडे बटर आणि त्याच्यासोबत असते पाव मस्त बटर लावून भाजलेले त्यांची चव ही काही वेगळीच असते.. मस्त मेजवानी पहिला घास तोंडात टाकल्यावर सगळं ब्रम्हांड आठवायला लागते.
माझ्या बायकोला जास्त आवडते ती म्हणजे पाणी पुरी, त्या दिवशी तिने घरात ही बनवली पण रस्त्यावर मिळणाऱ्या त्या घामजलेल्या हातांची पाणीपुरी खाण्यात काय वेगळीच मजा असते, पाण्याने टपोरी भरलेली थोडी आंबट, तिखट आणि गोड अशा मिश्र चाविनी बनलेली ही पाणी पुरी खाताना सगळं दुःख विसरायला होते. सध्या तरी आपल्या देशातील स्त्रियांची पाणी पुरी न खायला मिळणे ही एक समस्या होऊन बसलेली आहे. त्याचबरोबर शेवपुरी ही एक सुद्धा खायला तितकीच छान लागते कोण कोण दही पुरी खातो आता ते प्रत्येकाच्या आवडीवर असते.
सध्या तरी आपल्या देशात लोक चायनीज पदार्थ जास्त खातात. माझ्या बायकोला खूप आवडतात, त्यामुळे महिन्यातून २ ते ३ वेळा आनावेच लागतात. त्यातल्या त्यात लॉलीपॉप मला जास्त आवडतात. दिसायला लाल भडक आणि वरून मस्त कुरकुरीत एक चटणी देतात त्याच्यासोबत खायला मस्त खूप मजा येते. त्याच बरोबर माझ्या बायकोला फ्रॉईड राइस आवडतो मी पण तिच्यासोबत खातो पण मला जास्त करून नुडल्स आवडतात भाज्या अंड, चिकन आणि त्यांचे सॉस वापरून मस्त तव्यावर हलवून हलवून बनवतात.
माझ्या आवडीचे पदार्थ तुम्ही पाहिलेत पण तुम्हाला कोणकोणते पदार्थ आवडतात ते कमेंट करून सांगा आणि लॉक डाऊन संपल्यावर थोडे दिवस तरी बाहेरच खाऊ नका नंतर पुढे आयुष्यभर आपल्याला बाहेरचे खायचेच आहे.