कलिंगड सगळ्यांनाच खायला आवडतो आणि आता तर मार्केटमध्ये कलिंगडचा सीजन ही आहे आणि उन्हाळयात कलिंगड खाणे आपल्या शरीरातील ही खूप उपयोगी आहे. कलिंगड आपण बाजारात घेतो तेव्हा तो अखंड असतो. आतमध्ये तो लाल आहे की पांढरा हे आपल्याला घरी गेल्या वर कळते. लाल निघाले तर नशीब नायतर घरातल्यांचे दोन शब्द ऐकायला तयार राहायचे. पण हाच कलिंगड बाजारातून घेताना अशा काही गोष्टी आहे त्या लक्षात ठेवल्या तर तुम्हाला न कापता ही कलिंगड लाल आहे म्हणून समजेल.
कलिंगड हिरवे असतात पण त्याच्यावर डाग पडलेले तुम्ही नेहमी पाहत असाल. हे डाग वेगवेगळ्या रंगाचे असतात म्हणजे कधी पांढरे तर कधी पिवळे आणि केशरी रंगाचे ही डाग असतात. हेच डाग तुम्हाला कलिंगड घेताना फायदेशीर ठरतात. ज्या कलिंगडवर केशरी किंवा पिवळे डाग असतात असे कलिंगड घ्या. हे कलिंगड लाल असतात पांढरे डाग असलेले कलिंगड अजिबात घेऊ नका.
जसे आपल्या मध्ये स्त्री आणि पुरुष असतात तसेच फळांमध्ये ही आहेत. आता ते कसे ओळखायचे तर लांबट कलिंगड म्हणजे पुरुष आणि गोल कलिंगड म्हणजे स्त्री. गोड कलिंगड खायला गोड लागते. शिवाय कलिंगडाचा आकार हा सुद्धा मध्यम असायला हवा. म्हणजे तो जास्त लहान ही नसावा आणि जास्त मोठा ही नसावा.
आता महत्वाची टीप म्हणजे कलिंगडाचे देठ यांच्यावरून ही आपण ओळखू शकतो कलिंगड गोड आहे की नाही ते. कलिंगडाचे देठ हिरवे असेल तर समजून जा हे कलिंगड लवकर काढलेले आहे आणि हे गोड तर नाहीच लागणार याउलट ज्या कलिंगडाचे देठ हे सुकलेले असेल तेच कलिंगड घ्या ते पूर्णपणे पिकलेले असेल.

कलिंगड घेताना ते पहिल्यांदा उचलून पहावे कलिंगड वजनाला जड लागत असेल तर समजून जा ते कापल्यावर गोड लागणार. हलके कलिंगड कधीही घेऊ नये. शिवाय कलिंगड चारी बाजूंनी थोपटून पहावे जसे दुकानदार पाहतात. हे कलिंगड भरीव आणि डब डब असे आवाज येत असतील तर समजून जा हे कलिंगड गोड असणार.