विष्णूप्रिया हे नाव सर्वांच्या तोंडी तेव्हा आलं जेव्हा ती आपल्या एका व्हिडिओ ने वायरल झाली. आठवतंय का ते गाणं जे टिक टॉक वर खूप जास्त वायरल गेलं होतं?” खुदा की इनायत हैं”. हो तीच विष्णू प्रिया नंतर पुढे जाणून अनेक तरुणांच्या हृदयाची राणी बनली. प्रत्येकजण तिच्याबद्दल बोलू लागलं होतं.

त्या व्हिडिओ नंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. यशाची अनेक शिखरं तिने सर केली. तिने प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म दणाणून सोडला होता. सध्या तिचे इंस्टाग्रामवर २६ लाख फॉल्लोवर्स आहेत आणि ते पेज सुद्धा वेरीफाय आहे.
आज तिच्याबद्दल आलेली माहीत सर्व तरुणाने हृदय तोडणारी असेल. हो कारण तिने खूप वर्ष डेट करत असलेला प्रियकर साई पाटील सोबत भावी आयुष्याची सुखी सुरुवात केली आहे. आज या दोघांनी मोजक्याच लोकांसमोर साखरपुडा संपन्न केला आहे.

हे दोघं लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. ते आधी खूप छान मित्र होते आणि नंतर याच मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं. या दोघांनी खूप शॉर्ट व्हिडिओ सोबत केल्या आहेत तर अनेक अल्बम मध्ये सुद्धा दोघं सोबत झळकले आहेत.

त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.