झाडांची शुद्ध हवा, समुद्राच्या सानिध्यात अलिबाग मध्ये कुणाला राहायला आवडणार नाही, इच्छा तर प्रत्येकाची असते पण हातात पैसा असायला हवा. कारण आता जागेच्या किंमत गगनाला भिडल्या आहेत. पण किंमत कितीही असली तरी उद्योगपती, राजकारणी अभिनेते तसेच क्रिकेटर यांनी तेथील निसर्गरम्य वातावरण पाहून त्या ठिकाणी घर घेतली आहेत.
भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली याने अलिबाग मधील आवास मध्ये 6 कोटीचा बंगला खरेदी केला आहे. विराट कोहली हा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघात चालू असलेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी सामन्यामध्ये व्यस्त असल्याने तो हा बंगला खरेदी करण्यासाठी येऊ शकला नाही. तर त्याचा भाऊ विकास कोहली हा त्या वेळी उपस्थित होता. दुय्यम निबंधक कार्यालयात हा प्रोजेक्ट पूर्ण केला आहे.

अलिबाग येथील आवास लिव्हिंग प्रकल्पात LL P चे बंगलो प्रोजेक्ट आहेत. शिवाय निसर्गाच्या सानिध्यात हा प्रकल्प बनवण्यात आला आहे. अनेक उद्योगपती, राजकारणी अभिनेते तसेच क्रिकेटर या प्रकल्पात बंगला खरेदी करत आहेत. तसेच अभिनेता राम कपूर आणि त्याची बायको गौतमी कपूर या दोघांनीही या प्रकल्पात दोन घरे खरेदी केली आहेत.

महाराष्ट्रात विराट ने दुसऱ्यांदा घर खरेदी केला आहे यागोदर ही त्याने मुंबई मधील वरळी येथे ओंकार टावर मध्ये घर खरेदी केलं होतं.