विराट कोहली हे नाव प्रत्येक क्रीडा रसिकाच्या मुखात नेहमीच असते कारण सचिन तेंडुलकर नंतर लोक विराट कोहलीला जास्त फॉलो करत आहेत. त्याची खेळण्याची पद्धत, राग ,मनोरंजन अशा सर्वच गोष्टी लोकांना त्याच्या आवडतात. प्रत्येक सामन्यात काहीतरी वेगळं करण्याची त्याची जिद्द लोकांच्या नजरेत भाव खाऊन जाते. विराटने आजवर अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत आणि यापुढेही करेल ह्यात काही शंकाच नाहीये. पण आज आपण त्याच्या खेळाविषयी नाही तर त्याच्या एका चाहात्याविषयी बोलणार आहोत.

पिंटू बेहेरा असे ह्या चाहत्याच नाव असून त्याने विराट कोहलीचे १६ टेटू अंगावर काढले आहेत. ओडिशा मधील मशखल ह्या छोट्याश्या गावात राहणार हा युवक सध्या सर्वांची मने जिंकून घेतोय. त्याला लहानपणापासून क्रिकेट पाहण्याची आवड आहे. क्रिकेट पाहता पाहता विराट त्याचा आवडीचा खेळाडू बनला. एक दिवस टीव्हीवर रविना टंडन ह्यांचा टेटू एका युवकाने अंगावर गोंदवलेला त्यांनी पाहिला तेव्हाच त्यांनी स्वतःशी निर्धार केला की आपण सुद्धा विराट कोहलीचे असे टेटू शरीरावर गोंदवून घेऊ. अशा प्रकारे त्याने आपल्या शारीवर सोळा टेटू गोंदवून घेतले. सचिन तेंडुलकर ह्यांचा सुद्धा एक टेटू त्याच्या शरीरावर तुम्हाला पाहायला मिळेल.
काहीच दिवसापूर्वी विराट आणि पिंटूची भेट झाली. प्रॅक्टिस सामना पाहायला गेल्यानंतर आपले मराठमोळे सूनंदन नेने ह्यांची नजर पिंटूवर पडली त्यांनी त्याला जवळ बोलावले आणि आतमध्ये नेऊन विराट कोहलीची भेट घालून दिली. ह्या भेटीत पिंटूला अश्रू अनावर झाले होते. छोट्याश्या ह्या भेटीमुळे त्याच्या आयुष्याचे सार्थक झाले असे त्याचे म्हणणे आहे. आपण भारताचा प्रत्येक सामना स्टेडियममध्ये जाऊनच पाहणार असे त्यांनी आता निर्धार केलं आहे.