विनोद कांबळी क्रिकेट मधील एक दिग्गज नाव. पण क्रिकेट पेक्षा कांबळी विवाद हे जणू समीकरणच बनले होते. पण आज आम्ही तुम्हाला त्यांच्या वयक्तिक आयुष्यबद्दल काही सांगणार आहोत. पुण्यात हॉटेल ब्ल्यू डायमंड मध्ये काम करणाऱ्या नोएला लुईस हिच्यासोबत विनोदने आपल्या संसाराची लगीन गाठ बांधली. पण हे लग्न फार वर्ष टिकलं नाही. त्यांचा घटस्फोट झाला. ह्या पछात त्यांना एक मुलगा आहे. वेगळे झाल्यानंतर नोएलाने एंड्रिया हेविट सोबत लग्न केले.
विनोद कांबळीने पण पुढे जाऊन एंड्रिया सोबत दुसरे लग्न केले. पुढे जाऊन त्याने इसाई धर्माचा स्वीकार केला. पण त्याच्या मतानुसार सर्व धर्म एकसमान आहेत. आपल्या दुसऱ्या पत्नीकडून सुद्धा त्याला एक मुलगा आहे. ज्याप्रकारे क्रिकेटमध्ये कांबळी चर्चेत होता त्यानुसार आपल्या वयक्तिक आयुष्यातील चढ उतारामुले सुद्धा तो नेहमीच चर्चेत राहिला आहे.

पिंपरी चिंचवड मधील इंदिरा नगर ह्या भागातून विनोद कांबळी आहे. हे तुम्हा आम्हाला नक्कीच माहीत असेल. पण त्याचे संपूर्ण बालपण हे मुंबई मधील कांजूरमार्ग येथे चाळीत गेले. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे चड्डीतले मित्र म्हणजे अगदी लंगोटी यार. आपल्या शालेय जीवनापासून ते सोबत क्रिकेट खेळत आले आहेत. जेवियर्स स्कूल सोबत झालेल्या शालेय क्रिकेट सामन्यात ह्या दोघांनी ६६४ धावांचा मोठा डोंगर उभा करून एका नव्या विश्व विक्रमाला गवसणी घातली होती. ह्या भागीदारीत कांबळी ने ३४९ धावा केल्या होत्या.
तुम्हाला सांगायला आवडेल मी जेव्हा विनोद कांबळी आपल्या आयुष्यातील पहिलाच रणजी सामना खेळत असताना पहिल्याच चेंडूवर त्याने उत्तुंग असा षटकार ठोकला होता. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि टेस्ट मध्ये त्याने १९९२ आणि १९९३ मध्ये पदार्पण केले. टेस्ट मध्ये १४ सामन्यात १००० धावा काढून सर्वात जलद हजार धावा पूर्ण करण्याचा भारतीय मान पटकावला आहे. आपल्या नावावर टेस्ट मध्ये दोन द्विशतक आणि चार शतकही आहेत.