सध्या यूट्यूबवर मराठी कॉमेडी व्हिडिओ सर्वात जास्त कुणाच्या पाहिल्या जात असतील तर त्याचे माव विनायक माळी आहे. अत्यंत कमी वेळात त्याने लोकांच्या हृदयात आपले एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. जरी हा माणूस आगरी भाषेत व्हिडिओ बनवत असला तरी त्याच्या व्हिडिओ आगरी भाषेपर्यंत मर्यादित न ठेवता अमराठी लोक सुद्धा आवर्जून बघत असतात. आज त्याच्या यूट्यूब चॅनेलचे १० लाख सभासद पूर्ण झाले. एका मराठी युटयूबर ने असे करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मराठी मध्ये १ मिलियन म्हणजेच १० लाख आकडा पार करणे सोपे नव्हते. पण त्याने ही किमया करून दाखवली. अत्यंत साधी सोपी कॉमेडी, कोणतेही अपशब्द न वापरता कॉमेडी करणे हे विनायकचे खास वैशिष्ट. १९ नोव्हेंबर २०१८ मध्ये त्याने पोस्ट केलेली आगरी बॉय प्रपोज ही व्हिडिओ तुफान वायरल झाली. ह्या व्हिडिओ मुले विनायक माळी ला खऱ्या अर्थाने विनायक माळी म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर अनेक आगरी भाषेतील व्हिडिओ त्याने आपल्या चॅनेलवर पोस्ट केल्या.

कितीही टेन्शन असले तरी दादुसची व्हिडिओ पाहिल्यावर सर्व टेन्शन निघून जाते असे लोकांचे मानणे आहे. आणि तुम्ही त्याच्या व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हालाही ह्याचा अनुभव येईल की हे खरे आहे. आज २ मे २०२० रोजी त्याच्या चॅनेलवर १ मिलियन टप्पा सर केला. ही मेहनत त्याची आणि त्याच्या टीमची आहे. त्यामुळे विनायक माळी ने हा भलामोठा किल्ला सर केल्याने त्याला खूप साऱ्या शुभेच्छा आणि अजुन अशी अनेक शिखरे गाठण्यासाठी त्याला खूप खूप सदिच्छा.