विनय येडेकर यांना लहान पणापासून क्रिकेट खेळण्याची आवड होती आणि या क्रिकेटच्या वेडाने ते आपला क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर याच्याशी जोडलेला आहे. ते कसं काय तर लहानपणी क्रिकेट खेळताना त्यांच्यात झालेली मैत्री ते अजूनही या मैत्रीच्या घट्ट बंधनात अडकलेले आहेत. विनय येडेकर यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनच्याय वेळी देखील सचिनने हजेरी लावलेली पाहायला मिळाली होती. इतक्या वर्षांनी देखील त्यांची ही अतूट मैत्री आपल्याला आजही पाहायला मिळते.
सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी आणि विनय येडेकर ये तिघेही अगदी लहान पणापासूनचे मित्र होते. सचिन आणि विनोद यांची तर आपल्याला पहिल्यापासून एक क्रिकेट खेळाडू म्हणून ओळख आहेच पण विनय येडेकर हे सुध्दा याच खेळात अष्टपैलू होते हे आपल्याला कदाचित माहीत नसेल. याचे फोटो पाहिल्यावर यांची मैत्री आपल्याला दिसून येते.
एका मॅच मध्ये सचिन ने 28 वे शतक झळकावले होते त्यावेळी पार्टी करताना या त्रिकुटाने 28 वडापाव आणून ही पार्टी केली होती. कारण सचिन तेंडुलकर याला त्यावेळी खूप आवडायचा हे त्याच्या मित्रांनाही जवळून माहीत होते.
पण सध्या हा क्रिकेटचा चाहता आपल्याला चित्रपट सृष्टीमध्ये अडकलेला दिसतो आहे. याने आपल्या कारकीर्दीत मराठी नाटके, मालिका तसे चित्रपट ही केले आहेत. हा अभिनेता त्याच्या कॉमेडी करण्याच्या अभिनयामुळे आपल्याला अजूनही माहीत आहे. हसत खेळत, दिनूच्या सासूबाई राधाबाई अशी नाटके त्यांनी केली आहेत शिवाय कुंकू, अगं बाई अरेच्चा, मन्या सज्जना, ऐका दाजीबा, कमाल माझ्या बायकोची, नवरा माझा नवसाचा या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या विनोदाची झलक आपल्याला दाखवली आहे. याअगोदर त्यांनी बँकेत नोकरी केली होती शिवाय प्रत्येक व्यक्तीप्रमाणे आवड ही वेगळी होती ती म्हणजे फोटोग्राफी करण्याची.