बिग बॉस असा रिॲलिटी शो आहे जिथे अनेक क्षेत्रातील लोक प्रसिध्दी मिळवण्यासाठी येत असतात. या शो मध्ये अभिनेता असो, कोरिओग्राफी असो किंवा बॉडी बिल्डर असो सर्वांना इथे समान अधिकार असतात. जेव्हा पासून मराठी बॉस पर्व चार Big Boss Marathi 4 सुरू झालं आहे तेव्हापासून टीआरपी चा एक नवा उच्चांक गाठला आहे. यातले प्रत्येक स्पर्धक अतरंगी आहेत.
आपण आज वाचणार आहोत विकास सावंत Vikas Sawant बद्दल, जेव्हा त्याचे मराठी बिग बॉस मध्ये सिलेक्शन झाले तेव्हा त्याच्या आईवडिलांना खूप आनंद झाला. त्यांनी त्याला या रिॲलिटी शो मध्ये फक्त खर रहा असे सांगितले शिवाय नेहमी कमीपणा घे, कोणाला दुखऊ नको असेही सांगितले.
या शो मध्ये होणाऱ्या भानगडी, वाद विवाद, उखाल्या पाखाळ्या हे सर्व असेल तरीही हा शो तितकाच दरवर्षी लोकप्रिय ठरतो आहे. अशातच मराठी बिग बॉस मधील सध्या तरी विकास सावंत आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे. त्याचे वय 29 वर्ष आहे शिवाय तो मुंबईचा रहिवाशी आहे. याची उंची फक्त चार फूट आहे.

पण या उंची तो कमीपणा कधीच मनात नाही उलट त्याचा हा कमीपणा त्याची ताकत बनली आहे. त्याला त्याच्या या उंचीमुळे लोकांसमोर एकदम आपण किती खाली आहोत असा विचार मनात यायचा. पण 2009 मध्ये याच विकास ने इंडिया ज गोट टॅलेंट मध्ये सहभागी झाल्यानंतर त्याच संपूर्ण आयुष्यच बदलून गेले आहे. त्या शो मध्ये त्याचा डान्स बघून सर्वच त्याला सर म्हणून बोलायला लागले. त्याने रणवीर सिंग, रितेश देशमुख या अभिनेत्यांना डान्स शिकवला आहे.
आणि म्हणून आता जरी त्याच्या कमी उंचीमुळे कोणी बोलले तरी त्याला काहीच फरक पडत नाही. विकास सांगतो की त्याला सर्कस मध्ये काम करण्यासाठी अनेकांनी सांगितले पण त्याच्या वडिलांनी साफ नकार दिला. पण तरीही आता त्याचे वडील वयस्कर झाले आहेत त्यामुळे त्याला काम करणे भाग पडले त्यासाठी त्याने सर्कस मध्ये काम करायला सुरुवात केली.
सर्कस मध्ये तो जोकरचे काम करायचा. याशिवाय विकास ने डिलिव्हरी बॉयचे काम ही केले आहे. त्याचे एक यू टुब चॅनल ही आहे. पण आता त्याचे डायरेक्टर बनायचे स्वप्न आहे. त्याने पिक्चर मध्ये ही छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत.
विकासला एक बहिण ही आहे त्याने एका विदेशी मुलीला ही सहा वर्षे देट केलं आहे. सध्या तरी या शो मध्ये तो चर्चेत आहे. बघुया शो मध्ये पुढे अजून काय काय घडणार आहे किती भांडण आणि किती प्रेमाच्या आणाभाका होतील. विकासला त्यासाठी शुभेछ्या.