मित्रानो विजेचा झटका हा कोणालाही लागू शकतो. कारण त्यावेळी व्यक्ती हा त्या बाबतीत सतर्क नसेल किंवा ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्यात करंट डायरेक्ट सप्लाय होत असेल. अशा वेळेस व्यक्तीला विजेचा झटका बसणे स्वाभाविक आहे. शॉक लागल्यावर काही लोकांना हृदय विकाराचा झटका ही येतो. त्याचप्रमाणे मेंदूवरही याचा परिणाम होतो. याचा आपल्या घरात अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत जसे पण ज्यातून आपल्याला शॉक बसू शकतो. जेव्हा शॉक बसतो तेव्हा तो अचानक बसलेला असतो आणि त्या व्यक्तीला याची कल्पना नसते. अशा वेळेस आपण त्या व्यक्तीजवळ असल्यास आपण काय करू शकतो ते आज बघुया.
एखाद्या व्यक्तीला अचानकपणे विजेचा झटका लागला असेल आणि तुम्ही त्या ठिकाणी असाल तर पहिल्यांदा शॉक लागलेल्या व्यक्तिपासून लांब रहा. त्या व्यक्तीला स्पर्श करू नका, त्या व्यक्तीच्या आसपास पाणी नसायला पाहिजे. तुमच्या पायात पहिल्यांदा चप्पल असायला हवी ती पाण्याने ओली झालेली नसावी. त्यानंतर तुम्ही मेन स्विच ऑफ करा.
त्यानंतर त्या व्यक्तीला शॉक लागलेल्या वस्तूंपासून दूर करण्यासाठी लाकडी वस्तूचा उपयोग करा. म्हणजे काठी, फळी वगैरे. किंवा ज्या वस्तू पासून शॉक लागला आहे ती वस्तू काठीने दूर करा. लक्षात ठेवा लोखंडी वस्तूचा अजिबात उपयोग करू नका. अशा रीतीने त्या व्यक्तीला बाजूला काढल्यानंतर त्याला एका कुशीवर करा, जर त्या व्यक्तीला जखम झाली असेल तर ती जखम एका स्वच्छ कापडाने बांधा.
याचबरोबर जर तो व्यक्ती बेशुद्ध असेल आणि त्याचा श्वासोच्छवास बंद झाला असेल तर अशा वेळी त्याच्या छातीवर दोन्ही हाताने दाब द्यायला हवा आणि तुमच्या तोंडाने त्याला जोरजोरात श्वास द्या. लवकरात लवकर डॉक्टर कडे घेऊन जा. कारण शॉक लागल्यानंतर जरी ती व्यक्ती आपल्याला व्यवस्थित वाटत असली तरीही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.