साऊथ इंडियन सिनेमातील सुप्रसिद्ध अभिनेता विजय आपल्याला परिचित आहेच. त्याचे सिनेमेही आपण पाहत आलेले आहोत. पण या अभिनेत्याचा मुलगा संजय हा गेल्या वर्षी कॅनडा या देशात आपले पुढील शिक्षण घेण्यासाठी गेला होता. त्याच्या मुलाने थोड्या बहुत लघुपट यामध्ये काम केले आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता सध्या तरी तो भारतात येऊ शकत नाही.
कारण भारताबरोबर अनेक देशांनी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे इच्छा असूनही कुणी भारतात सध्या येऊ शकत नाही किंवा भारताबाहेर जाऊ शकत नाही. आणि याच गोष्टीची सर्वात जास्त चिंता ही या अभिनेत्याला लागली आहे. अर्थातच प्रत्येक बापाला आपल्या मुलाबद्दल काळजी वाटणे साहजिक आहे.
आपल्या मुला बद्दल वाटणारी चिंता जरी साहजिक असली तरी सध्या कॅनडामध्ये इतर देशांप्रमाणे ह्या देशात हा संसर्ग पाहण्याचा धोका तसा कमीच आहे. पण तरी एका बापाचं हृदय कसं असते हे नवीन सांगायची गरज नाही. सध्या विजय हा अभिनेता ही चेन्नई मधील आपल्या घरात कॉरन्टाइन आहे. जे सध्याच्या काळात सगळ्यांनीच करणे गरजेचे आहे.
सध्या तरी विजय या अभिनेत्याचा ‘मास्टर’ हा सिनेमा येण्याची आतुरता आहे. पण आताची परिस्थिती पाहता हा सिनेमा पुढे ढकलला आहे. कारण ९ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. त्याचप्रमाणे असे बरेच सिने तारकांचे सिनेमे आहेत ते सध्या तरी पुढे ढकलले आहे.