मराठी सिने सृष्टीत विजय गोखले हे नाव खूप मोठं आहे. आपल्या अजरामर अभिनयाने त्यांनी अनेक वर्ष रसिक प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आजवर त्यांनी अनेक हिंदी मालिका, मराठी मालिका आणि चित्रपट केले आहेत. १९९५ मध्ये प्रसिद्ध हिंदी मालिका श्रीमान श्रीमती मध्ये सुद्धा त्यांची मुख्य भूमिका होती. ह्यानंतर सुद्धा त्यांनी अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले होते.
हम सब एक है, सी आय डी, सात फेरो की हेरा फेरी, जमाई राजा, दील विल प्यार व्यार, हम आपके हैं वोह ह्या मालिकांचा ते महत्वाचा भाग होते. मराठी मध्ये त्यांनी एक उनाड दिवस, सर कसं शांत शांत, पोलिसाची बायको, घरंदाज, माहेरचा निरोप, ही पोरगी कुणाची, मुंबईचा डबेवाला, भरत आला परत, बाबा लगीन, सालीने केला घोटाळा, झक मारली बायको केली, भागम भाग, चला खेळ खेळूया दोघे, असा मी काय गुन्हा केला, टाटा बिर्ला आणि लैला, मामाच्या राशीला भाचा, दम असेल तर, पारंबी, ही मम्मी हे डॅडी ह्यासारख्या चित्रपटात सुद्धा कामे केली आहेत.
त्यांनी आतापर्यंत दोन सिनेमे सुद्धा दिग्दर्शित केले आहेत. त्यात भरत आला परत आणि दम असेल ह्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यांचा आवाज कानी पडताच आपल्या लगेच कळून चुकते की विजय गोखले आहेत. एवढं वैशिष्ट्यपूर्ण त्यांचा आवाज त्यांना लाभला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का त्यांचा मुलगा आशुतोष गोखले सुद्धा मराठी मालिका आणि नाटकात काम करतोय. बऱ्याच लोकांना हे माहीत असेल ज्यांना नाही माहिती त्यांनी नक्की जाणून घ्या.
आशुतोष गोखलेला तुम्ही जयदीप सरमंजामे म्हणून नक्कीच ओळखत असणार. झी मराठीच्या तुला पाहते ह्या मालिकेत विक्रम सरमंजामे म्हणजेच सुबोध भावेंच्या लहान भावाची भूमिका त्याने केली होती. ह्या मालिकेत एवढे दिग्गज कलाकार असताना सुद्धा त्याने आपला एक वेगळा ठसा उमटविला होता. ह्यानंतर आता तो रंग माझा वेगळा ह्या मालिकेत सुद्धा मुख्य भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

त्याने आपल्या करीयरची सुरुवात वडिलांच्या दिग्दर्शित दम असेल तर (२०१२) मध्ये केली होती. त्यांनतर त्याने रंगभूमीवर सुद्धा काम केले. त्याचे आजोबा लेखक तर वडील अभिनेता दिग्दर्शक असल्या कारणाने त्याला अभिनयाचे बाळकडू तर घरातूनच मिळाले आहे. पण एवढे असताना सुद्धा त्याने आपल्या हिमतीवर छोट्या छोट्या भूमिका करून आता तो मुख्य भूमिका करत आहे. त्याचा हा प्रवास दिसताना जरी सोपा वाटत असला तरी खडतर आहे.