साऊथ मधील अनेक अभिनेत्री तुमच्या आमच्या परिचयाच्या आहेत. पण ह्याच सिनेमात काही असे चेहरे समोर येतात ज्यांना आपण कधीच विसरू शकत नाही. वर फोटोमध्ये असलेला चेहरा तुम्हाला अनेक सिनेमा तुमचे मनोरंजन करताना दिसला असेल. पण नक्कीच तुमच्यापैकी खूप लोकांना ह्या हास्य अभिनेत्रीचे नाव सुद्धा माहित नसेल. पण आज आम्ही तुम्हाला तिच्या वयक्तिक आयुष्याबद्दल सांगणार आहोत.

स्क्रीनवर जाड जुड दिसणारी ही अभिनेत्री आता खूप बारीक झाली आहे. ह्या अभिनेत्रीचे नाव विद्युल्लेखा रमण आहे. तमिळ क्षेत्रातील अभिनेते मोहन रमण ह्यांची ती कन्या. आपण तिला अनेक तमिळ तेलगू सिनेमात लोकांना हसवताना पाहिले आहे. तिने आतापर्यंत ५१ सिनेमात वेगवेगळ्या भूमिका करून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. महत्त्वाचे समजले जाणारे एडिसन आणि नंदी अवॉर्ड सुद्धा तिला आपल्या अभिनयामुळे मिळाले आहेत.

तिचे ते जाड जूड शरीर आणि सोबत अभिनय आपल्याला नेहमीच हसायला भाग पाडतो. पण तिने आपल्या लूक मध्ये पूर्णतः बदल घडून आणला आहे. तिला ओळखणे सुद्धा खूप कठीण होऊन बसलं आहे. आधी तिच वजन ९० kg च्या आसपास होतं पण आता तेच वजन तिने जून महिन्यापर्यंत ६८ kg वर आणले आहे.

ह्यामागे तिची मेहनत दिसून येते. योगा, व्यायाम आणि योग्य खाणे पिणे ह्यामुळे ती हे करू शकली. सध्या शूटिंग बंद असल्याने तिने घरात राहून खूप काही कमावलं आहे, असेही तिने आपल्या एका लाईव्ह सेशन मध्ये म्हटले आहे. मित्रानो तुम्हाला ह्या अभिंत्रीचे नाव अगोदर माहित होत का? आणि तिचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो? आम्हाला नक्की कळवा.
हे पण वाचा गायिका कार्तिकी गायकवाडचे ठरले आहे लग्न, पाहूया कोण आहे तिचा जोडीदार