विड्याचे पान खाण्याची सवय अनेक जणांना असते हा विड्याचा पान जेवणानंतर खाल्ला जातो, आपल्या घरातील वयस्कर माणसे ही आपल्याला नियमित पान खाताना दिसतात. त्यांच्याकडे पान बनवण्यासाठी पेटी असते त्या पेटीत अनेक गोष्टी असतात ज्या वापरून पान तयार केला जातो. चुना,कात,सुपारी आणि नागवेली या या वनस्पतीची पाने वापरून पान तयार करतात.
काही लोक म्हणतात विड्याचे पान खाल्याने शरीराला हानिकारक आहे पण खरं तर तस आहे का? तर नाही कारण पान हे नैसर्गिक आहे. त्याच्यातून आपल्या शरीराला मिळणारे घटक हे चांगलेच असतात. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पान तयार करतांना तंबाखूचा वापर अजिबात करू नका. ते तुमच्या शरीरातील हानिकारक ठरू शकते तंबाखू मुळे कॅन्सर होतो. त्यामुळे पान खाताना तंबाखू वगळा.
तुमची दाढ दुखत असेल यावर विड्याचे पान खाणे उत्तम उपाय आहे. त्यासाठी विड्याचे हिरवे पान घेऊन त्यात कापूर टाका आणि हे पान चघळा हे पान खाल्याने तुमच्या दातांच्या अनेक समस्या दूर होतात.
सर्दी झाली असेल तर त्यासाठी विड्याचे पान खाणे. यासाठी विड्याचे पान खाताना त्या पानात लवंग टाका व थोडी साखर टाका आणि हे पान खा. शिवाय खोकला झाला असेल तर विड्याच्या पानात थोडी हळद टाकून ते खा त्यामुळे तुम्हाला फरक पडेल
तुमचं सारखं डोकं दुखत असेल तर हे पण खूप उपयोगी आहे डोकं दुखत असेल तर या पानाचा रस काढून तो डोक्याला लावा. शिवाय विड्याचे पान खाल्याने तोंडाची दुर्गंधी निघून जाते शिवाय पोटातील जंत ही नष्ट होतात.
इंडियन इन्स्टिट्युट ऑफ केमिकल बायोलॉजीने संशोधन केल्यानुसार यात असे आढळून आले आहे की विड्याचे पान खाल्याने ‘क्रॉनिक माइलॉइड ल्यूकेमिया’ या आजारासाठी लढा देण्यासाठी आवश्यक असणारे घटक आपल्याला मिळतात.
शिवाय ज्या लोकांची पचनक्रिया बिघडते त्यांनी विड्याचे पण खा त्यामुळे पचनक्रिया सुधारते शिवाय ज्यांना बद्धकोष्ठता हा त्रास होतो त्यांच्यासाठी विड्याचे पान उपयुक्त आहे.
हे पण आर्टिकल वाचा
- चेहऱ्यावर लावा बर्फ आणि मिळवा सुटका चेहऱ्याच्या अनेक अडचणी पासून. वाचा पूर्ण
- झंडू बाम लावल्यावर आग का होते माहीत आहे का? वाचा