या घरात मी दोन वर्षांपूर्वीच आले होते लग्न होऊन मला एक बाळ ही आहे ते फक्त सहा महिन्यांचे आहे. माझा नवरा आणि मी आमचा खूप सुखाचा संसार होता सासू आणि सासरे ही आहेत पण तरीही माझा नवरा गाडीवर येताना अपघात झाला आणि तिथेच त्याने प्राण सोडला. माझ्या नवऱ्याला जाऊन आता सात महिने झाले म्हणजे आमचं बाळ या जगात येण्याच्या एक महिना आगोदरच माझा नवरा आम्हाला सोडून गेला, आमच्या बाळाचं तोंड ही त्याला पाहता आलं नाही हे त्या बाळाचं दुर्भाग्य.
खूप रडले मी पण त्यावेळी इतकी शक्ती ही नव्हती माझ्यात रडण्यासाठी, वाटलं होत आता सर्वच संपलं पण पोटात बाळ लाथा मारत होत कदाचित बाळाला ही त्याचे बाबा सोडून गेल्याची चाहूल लागली असावी. अचानक इतका मोठा आघात झाल्यामुळे आमच्या घरातील सर्वच रडत होते माझे सासू सासरे आणि माझ्या घराची ही कारण अाता त्यांची मुलगी विधवा झाली होती. तिच्या कपाळावरचे कुंकू पुसले गेले होते आणि एकटी पडली होती, हे माझ्या घरातल्यांना समजत होते. पण फक्त डोळे पुसन्या व्यतिरिक्त ते काहीच करू शकत नव्हते. एकदा त्यांनी मला घरी येतेस का म्हणून विचारले पण फक्त विचारायचे म्हणून विचारले पण मी नाहीच म्हणाले, कारण माझ्या पोटात त्यांचा वंश होता आणि त्याला घेऊन मी माहेरी राहणे मला तरी चांगले वाटले नाही.
खर आहे जोपर्यंत आपला नवरा असतो तोपर्यंत सगळं जग आपल असते पण जेव्हा नवरा हे जग सोडून जातो त्यावेळी मात्र सगळं जग तोंड फिरवते. त्यानंतर माझ्या बाळाचा जन्म झाला आणि मी थोडी सावरले. त्याच्या तोंडाकडे बघून मला माझ्या नवऱ्याची आठवण यायची. अगदी माझ्या नवऱ्यासारखा दिसायचा माझा मुलगा. माझे सासू सासरे जोपर्यंत माझा नवरा जिवंत होता माझ्याशी प्रेमाने बोलायचे. पण आता त्यांच्या बोलण्यात ते प्रेम मला तरी दिसत नाही, कारण आता प्रत्येक गोष्टीवरून मला ते बोलत असतात. अशीच वाग घरातून बाहेर सारखी जाऊ नकोस, जास्त गडद रंगाचा साड्या नेसू नकोस. हे घालू नको ते घालू नको का पण माझा नवरा गेला तस माझं जागणही संपलं होत का? मी स्वतंत्रपणे श्वास ही घेऊ शकत नव्हते इतकं बदलतं का नवऱ्याशिवाय जग.
माझ्या घरातीलच नाही तर शेजाऱ्यांच ही वागणं बदललं होत. आता नेमके कसे वागत असतील बरं शेजारी हे तुम्हाला सांगायची गरज आहे का? तरुण आणि लग्न झालेले पुरुष ही आता वेगळ्या नजरेने पाहायला लागली होती. माहीत नाही पण स्त्री ही फक्त उपभोगाची वस्तू आहे हे मला आता कळायला लागले होते. प्रत्यक्ष कोणी काही बोलत नसले तरी त्यांच्या नजरेतील घाण लगेच दिसून येते. प्रत्येक वेळी मदतीला येण्या मागचा त्यांचा उद्देश ही माझ्या लक्षात येत होता. पण ते सगळं मी झिडकारत होते फक्त माझ्या मुलासाठी त्याला मला मोठ करायचं होत, चांगलं शिक्षण द्यायचं होत आणि महत्वाचं म्हणजे. चांगला माणूस म्हणून जगण्याचा कानमंत्र द्यायचा होता.
आता माझा मुलगा दोन वर्षाचा आहे आणि माझ्यासाठी बिजवर मागणी यायला लागली होती. मी दिसायला तशी सुंदर होते म्हणायला गेले तर तशी प्रत्येक स्त्री ही दिसायला सुंदरच असते पण मला वाटते त्या वेळी मला खूप जास्त अडजस्त मेंट करावी लागली. कारण जो मला वर आलेला होता तो माझ्या दुप्पट वयाचा होता आणि त्याला एक लग्नाची मुलगी होती. सगळ्यांची या लग्नाला संमती होती मला खरं तर माझं असं मत राहिलंच नव्हत. शिवाय तो माझ्या मुलाला ही स्वीकारणार होता म्हणून मी सुद्धा हो म्हणाले आणि लग्न ही झाले.
लग्नाला आता एक वर्ष झाला खरं तर मला वाटलं हे लग्न म्हणजे एक अॅडजस्टमेंट होती. पण जेव्हा हे लग्न झाले तेव्हा सगळच पालटून गेलं. माझा नवरा जरी माझ्यापेक्षा दुप्पट वयाने असला तरी माझ्यावर आणि माझ्या मुलावर त्याचा खूप जीव आहे. इतकचं काय त्याने मला होऊन गेलेल्या भूतकाळाची कधीही आठवण होऊ दिली नाही. मला तरी वाटते खरंच का? संसार करण्यासाठी आणि जोडीदार निवडण्यासाठी वयाची अट असणे गरजेचे आहे. मला तरी वाटते मुळीच नाही.
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण)