Home खेळ/Sports ह्या कारणामुळे विकी कौशल याच्यासोबत काम करण्यास या अभिनेत्रीने दिला होता नकार

ह्या कारणामुळे विकी कौशल याच्यासोबत काम करण्यास या अभिनेत्रीने दिला होता नकार

by Patiljee
207 views

विकी कौशल सध्या तरी तरुणींच्या दीलाची धडकन असणारा हा अभिनेता दिसायला हँडसम आणि स्मार्ट तर आहेच पण याचे अभिनय पाहून जी वाह वाह नाही करणार असा माणूस सापडणार नाही. याचा पहिला सिनेमा मसान हा सिनेमा पहिलाच असेल त्यातील त्याची भूमिका वाखडण्या जोगी होती. नंतर आलिया भट्ट सोबत राजी सिनेमात मुख्य भूमिका त्याने साकारली होती. शेवटी डोळ्यातून अश्रू आणणारा हा सिनेमा विकी कौशल याची छाप पाडून गेला.

विकी कौशल याला बॉलिवुड मधील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या म्हणजेच दीपिकाने विकीच्या सोबत चित्रपट करण्यास नकार दिला होता. दीपिका ही सध्याच्या काळातील टॉपची अभिनेत्री तिने आपल्या करिअर मध्ये अनेक हिट चित्रपट दिले . आजपर्यंत तिने अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आणि त्या प्रेक्षकांच्या मनात उतरवल्या. पण विकी कौशल याच्या सोबत ती एका चित्रपटात दिसणार होती पण तिने विकी कौशल बरोबर सिनेमा करण्यास नकार दिला.

भन्साळी यांना राजा रतनसिंग या चित्रपटासाठी एखादा नवीन चेहरा हवा होता आणि त्यासाठी त्यांनी विकी कौशल याची निवड केली होती. विकी कौशल याचा सध्या प्रदर्शित झालेला सिनेमा म्हणजेच मसान यातील विकीचा अभिनय पाहून त्यांनी विकीला या चित्रपटासाठी निवडले. विकी याने या चित्रपटातही ऑडिशन सुद्धा दिले होते.

पण दीपिका पदुकोण हिने हा सिनेमा विकी कौशल सोबत करण्यास नकार दिला कारण तिला ह्या चित्रपटात कोणीतरी ए कॅटेगरीत बसणारा अभिनेता हवा होता आणि हेच सर्वात मोठे कारण की भन्साळी यांनी विकी ला या चित्रपटातूना वगळण्यात आले. पण सध्या विकी कौशलने आपल्या अभिनयाने एक वेगळी उंची गाठली आहे. प्रत्येक अभिनेत्री त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक असते. लवकरच त्याचा होरर भूत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल