साऊथ सिनेमे आपण का पाहतो? असा प्रश्न कुणी विचारला तर आपोहून तुमच्या तोंडून दोन शब्द बाहेर पडतील. एक तर सिनेमातील ऍक्शन दुसरं कॉमेडी. साऊथ सिनेमात अनेक असे कॉमेडी कलाकार आहेत ज्यांना पाहूनच हसू येत. सिनेमात ते असले म्हणजे हास्याची मेजवानी १०० टक्के असणार हे ठरलेलं असतं. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कलाकाराबद्दल सांगणार आहेत ज्यांनी गेली दहा वर्ष आपल्याला खूप हसवले आहे.
वर त्या अभिनेत्याचा फोटो पाहून तुम्ही ओळखले असेलच पण त्याच नाव आहे वेनेला किशोर. बऱ्याच लोकांना त्याचा चेहरा माहीत आहे पण नाव माहीत नसेल. त्याचा जन्म हिंदू कुटुंबात चेन्नई १९ सप्टेंबर १९८० मध्ये झाला. त्याने आपले शालेय शिक्षण जीवादन कॉन्व्हेन्ट हायस्कूल मधून केलं. त्याने आपली पदवी वाणिज्य शाखेतून घेतली आहे. त्याने मास्टर इन इन्फॉर्मेशन सिस्टमची पदवी सुद्धा घेतली आहे. याचमुळे त्याने USA मध्ये सॉफ्टवेअर क्वालिटी इंजिनिअर चे काम सुद्धा केलं होतं.
त्याने आपल्या अभिनयाची सुरुवात २००५ मध्ये वेनेला सिनेमातून केली होती. म्हणुनच तेव्हापासून त्याला वेनेला किशोर ह्या नावाने ओळख मिळाली. ह्या सिनेमातील त्याच्या अभिनयाने सर्वांनी त्याला दाद दिली. त्यानंतर त्याने अनेक सिनेमात कॉमेडी कलाकाराचे काम ठोसपणे बजावले. एका मागून एक असे हिट सिनेमे त्याने ह्या दरम्यान दिले. ह्यात बिंदास, इंकोसारी, पिल्ला जमिनदार, दारुवा, बादशहा, नीवेवरो, कथनायाकुडू ह्या सारख्या ब्लॉक बस्टर सिनेमाचा समावेश आहे.

२०१० मध्ये त्याला पहिल्यांदाच बेस्ट कॉमेडियन नंदी अवॉर्ड सुद्धा मिळाला होता. बेस्ट कॉमेडियन आयआयफा उत्सवम अवॉर्ड सुद्धा २०१५ मध्ये मिळाला आहे. साऊथ सिनेमात त्याला पुढील ब्रह्मानंडम अशी ओळख प्राप्त आहे. त्याने आपली वाटचाल अभिनयापर्यंत ना ठेवता पुढे सुद्धा वाढवली आहे. त्याने साऊथमध्ये दोन सिनेमाचे दिग्दर्शन सुद्धा केलं आहे. ह्यात वेनेला वन हाफ आणि जाफ्फा ह्या सिनेमाचा समावेश आहे.