वेड सिनेमा खरंच सर्वांना वेड लाऊन सोडतोय. प्रत्येकजण या सिनेमाचा चाहता झाला आहे. रितेश देशमुख आणि जिनीलिया देशमुख यांची जोडी खऱ्या आयुष्यासोबत पडद्यावर सुद्धा धुमाकूळ घालतेय. सिनेमा प्रत्येक गोष्टीत भाव खाऊन जातोय. कथानक, अभिनय, संगीत, डायलॉग अगदी सर्वच फार सुंदर जमून आलंय. म्हणून सद्ध्या प्रत्येकजण या सिनेमाबद्दल बोलत आहे.
सिनेमाचे फर्स्ट पोस्टर जेव्हा प्रदर्शित झालं होतं तेव्हापासून हा सिनेमा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्यात रितेश आणि जिनीलिया पुन्हा एकदा अभिनय करताना दिसणार आणि ते सुद्धा मराठी मध्ये हे सर्व चाहत्यांसाठी पर्वणी होती. त्यातच हा सिनेमा अजून जास्त भाव खाऊन तेव्हा गेला जेव्हा अजय अतुल या सिनेमाला संगीत देतील असे जाहीर करण्यात आलं. सिनेमाचे संगीत सध्या तुफान वायरल झालं आहे.
पहिल्याच आठवड्यात सिनेमाने कोटींची कमाई पार केली आहे. आतापर्यंत वेड चित्रपटाने २०.६७ कोटींचा गल्ला जमवला आहे. पहिल्या दिवशी पासून या सिनेमाने हाऊसफुलचे बोर्ड चित्रपटगृहा बाहेर लावले. हा सिनेमा लवकरच ५० कोटींच्या क्लबमध्ये शामिल होईल याबद्दल काही संशय नाही. तुम्ही पहिला आहे का हा सिनेमा? कसा वाटला तुम्हाला? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.