Home संग्रह वटवाघूळ हा पक्षी आहे की प्राणी बघा वाचा संपूर्ण माहिती

वटवाघूळ हा पक्षी आहे की प्राणी बघा वाचा संपूर्ण माहिती

by Patiljee
7536 views

वटवाघळे ही आपण कधी तरी झाडावर किंवा एखाद्या पडीक ठिकाणी उलटी टांगलेली पहिली असतील. वटवाघूळ हे देशातील काही ठिकाणी शुभ मानले जाते तर काही ठिकाणी अशुभ मानले जाते. आपल्या भारतातही वटवाघूळ हा पक्षी अशुभ मानला जातो. आता वटवाघूळ हे शुभ आहे का अशुभ यावर विश्वास ठेवणे म्हणजे कठीण गोष्ट आहे कारण अताचा काळ इतका पुढे गेला आहे आणि या असल्या गोष्टींवर विश्वास ठेवणे म्हणजे एका पक्षाला तो शुभ आहे किंवा अशुभ आहे हे ठरवणारे आपण कोण?

त्यालाही स्वच्छंद पने जगण्याचा अधिकार आहे जसे या धरतीवर सगळ्या जीव जंतूंना आहे. एखादे वटवाघळे उडता उडता आपल्या घरात आले तर लोक समजतात या घरात आता नक्कीच काही तरी वाईट घडणार आहे म्हणून पण हे चुकीचे आहे.

माणसापासून नेहमीच लांब राहणारा हा पक्षी हा सस्तन प्राणी म्हणून ओळखला जातो. दिवसभर हा पक्षी तुम्हाला कधीच पाहायला मिळणार नाही. ते दिवसा निद्रावस्थेत असतात म्हणजेच आपल्या राहत्या ठिकाणी जुन्या पडीक गुफा किंवा अन्य जुनी ठिकाणे या ठिकाणी उलटी टांगलेली असतात. वटवाघूळ यांचे दोन प्रकार पाडतात एक मायक्रो bats आणि दुसरा मेगा bats हे आहेत. वटवाघूळ हा पक्षी नसून ती सस्तन प्राणी आहे. जरी तो आकाशात पक्षांप्रमाणे मुक्त संचार करत असला तरी तो पक्षांप्रमाणे अंडी घालत नाही तो प्रत्यक्ष पिलांना जन्म देतो. म्हणून त्याला सस्तन प्राणी म्हणतात.

वटवाघूळ याचे आहारात छोटे मोठे किडे तसेच झाडावरची फळे खातात. त्यांचा रंग काळसर तसेच राखाडी रंग असतो. त्यांना टोकदार असे दात असतात. निशाचर प्राणी आहे. रात्री तो आपली शिकार करण्यासाठी आकाशात फिरताना पहिला असेल, काही लोक म्हणतात की वटवाघूळ यांना दिवसा दिसत नाही पण ते खरे नाही त्यांची दृष्टी थोडी कमकुवत असते पण ते आंधळे नसतात. भारतात एकूण 12 जातीची वटवाघूळ आढळतात या वटवाघूळचा खर तर आपल्या शेतकऱ्याला जास्त फायदा होत असतो. ती ज्या ठिकाणी राहतात तेथील जमीन ही अधिक भुसभुशीत राहते. त्या वटवाघूळच्या विष्ठेमुळे. हे वटवाघूळ जमावाने राहत असतात नर आणि मादी यांचे ग्रुप वेगवेगळे असतात. विनीचा हंगाम आल्यावर हे एकत्र येतात.

वटवाघूळ या प्राण्याबद्दल आपल्या देशातील लोकांच्या मनात शंका आहेत त्या दूर व्हायला हव्यात, वटवाघूळ रक्त पितात वगैरे पण त्यात कितपत सत्य आहे हे तुम्ही ही समजू शकता, जसे कुत्रा आणि माकड चावल्यावर रेबीज होतो त्याचप्रमाणे वटवाघूळ चावल्यावर ही रेबीज होतो म्हणून आपण कुत्रा आणि माकड यांना आपल्या धर्तीवरील एक जीव म्हणून आसरा दिला आहे. त्याचप्रमाणे वटवाघूळ हा ही एक जीवच आहे.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल