Home करमणूक वनिता खरात अडकणार लग्नगाठीत

वनिता खरात अडकणार लग्नगाठीत

by Patiljee
615 views

महाराष्ट्राची हास्य जत्रा हा शो लोकांना हसवण्याचे काम करतो यातील प्रत्येक कलाकार आपल्याला नेहमीच आपल्याला टेंशन फ्री करत असतात. यातील एक म्हणजे वनिता खरात. दिसायला अगदीच हिरोईन सारखी नसली तरी तिची कला ही लोकांना हसवण्याची आहे आणि ती त्यात खरी उतरली. तिच्या या शो मध्ये अनेक भूमिका आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे खरात काकू, आजी, मामी, सासू, गौरवची प्रेयसी अशा अनेक अतरंगी भूमिका करून लोकांना हसवले आहे.

पण आता ही अभिनेत्री लग्न करत आहे. तिच्या घरी ही सनई चौघडे वाजणार. प्रत्येक मुलीचे हे स्वप्न असतेच. काही दिवसांपूर्वी वनिता हिने तिचा आणि सुमित लोंढे यांचा एक फोटो ही शेअर केला होता. त्यात तिने आपल्या प्रेमाची कबुली ही दिली आहे आणि त्याचबरोबर ते लग्न करणार आहेत हे सुध्दा सांगितले. 2 फेब्रुवारी 2023 ही त्यांच्या लग्नाची तारीख असणारा आहे.

अशीच दोघांची एका माध्यमाद्वारे ओळख झाली. ओळखीचे प्रेमात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. त्यांचे हे प्रेम हास्य जत्रेतील तिच्या सहकलाकार यांना माहीत होते कारण सुमित हा वनिता हिला भेटण्यासाठी नेहमीच सेट वरती यायचा आणि म्हणूनच आता लग्नाची तारीख जवळ आली आहे. त्यामुळे जोरदार तयारी चालू झाली आहे. तिचा होणारा नवरा सुमित हा एक फोटोग्राफर आहे.

याशिवाय तो ब्लॉग बनवतो आणि व्हिडिओ क्रियेटर ही आहे. सध्या तरी ती तिच्या लग्नाच्या तयारीत असणार त्यामुळे कला क्षेत्रापासून थोडे दिवस सुट्टी वर असणार. वानिताने विकी वेलणकर, इलू इलु , रान बाझार, इंडिया लॉकडाऊन अशा चित्रपट मधून छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत. सध्या ती येणाऱ्या सरला एक कोटी या चित्रपटातून दिसणार आहे. आणि आता पोस्ट ऑफिस उघडे आहे यात ती सरला मावशी हे पात्र साकारताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल