Home कथा Valentine’s Week कथा मालिका | चाप्टर ०२ प्रपोज डे

Valentine’s Week कथा मालिका | चाप्टर ०२ प्रपोज डे

by Patiljee
855 views

ती येऊन माझ्या बाकावर बसली. अलगद ते लालभडक गुलाब माझ्या हातात ठेऊन म्हणालो हॅप्पी रोझ डे महेंद्र.. न घाबरता अगदी माझ्या डोळ्यात डोळे घालून तिने मला हे गुलाब दिलं होतं. हे असे मलाही जमलं नसतं. थॅन्क्स तृष्णा म्हणत मी तिच्याकडे पाहत लाजलो. तिचे नाव तृष्णा होते.. नावातच किती गोडवा आहे ना, अगदी नावातच सर्व काही सामावून जातं.

कथेचा पहिला भाग वाचा रोझ डे

वर्गशिक्षक वर्गात शिरताच सर्व शांतता पसरली. सर्व काही स्वप्नासारखे घडले होते. एवढी मुलं तिच्या मागे असताना तिने मलाच का गुलाब दिलं? हा सर्वात मोठा प्रश्न मला पडला होता. त्यात तिच्याकडे मी पाहिले की ती फक्त लाजत होती. शाळेचा आजचा दिवस संपला पण आम्हाला बोलायला हवा तसा वेळ मिळाला नाही म्हणून शाळेतून बाहेर पडल्यावर मी तिच्या माठी मागे गेलो.

“तृष्णा थांबशिल एक मिनिट जरा बोलायचे आहे तुझ्याशी असे थोड घाबरत मी म्हटलं”. “या महेंद्र साहेब या.. अनेक महिन्यात एवढी वाक्य तुम्ही पहिल्यांदाच बोललात ना माझ्याशी” अशी म्हणत ती खुदकन हसली. मला थोड लाजल्या सारखं झालं खरं पण मी विषय टाळत म्हणालो “रोज चालतच घरी जातेस का”? पण तिने सुद्धा त्याच तोऱ्यात उत्तर दिले “हो रोज चालत घरी जाते आणि याच रस्त्याने जाते आणि तुम्ही सुद्धा नकळत रोज मला घरी सोडता आणि मग तुमच्या घराकडे स्वारी नेता. आम्हाला माहीत आहे की सर्व”. इथे मात्र मला थोड लाजल्या सारखे झालं. मी रोज हीचा पाठलाग करत हिला घरपर्यत सोडतो हे माहीत होत हिला हे ऐकून थोड का होईना मन सुखावलं.

मी सरळ मुद्द्याला हात घातला. एवढ्या मुळात तू आज मलाच का गुलाब दिलंस? ती म्हणाली “कारण ज्या मुलाला माझी कदर आहे, माझी काळजी आहे तो माझा महेंद्र आहे म्हणून”. मी थोडा अचंबित झालो मी काय काळजी केली हीची. तेव्हा तिनेच सांगायला सुरुवात केली. “तू वर्गात माझ्याशी बोलत नसलास तरी नेहमी माझी काळजी असते तुला. रोज मला सोडायला घरी येतोय. शाळेत येताना पाटील काकांच्या वाड्याजवल एक कुत्रा नेहमी माझ्या अंगावर भुंकत असायचा. पण मला माहित आहे की त्या काकांसोबत बोलून त्या कुत्र्याला तू त्यांच्या शेतावर पाठवले आणि माझ्या येण्या जाण्याचा मार्ग मोकळा केलास.

एवढेच नाही तर मागच्या महिन्यात आपल्या शाळेची ट्रीप बाहेरगावी गेली होती आणि माझे बाबा मला येण्यासाठी परवानगी नव्हते देत म्हणून तू केनी सराना माझ्या घरी पाठवून बाबाकडून परवानगी मिळवलीस. या सर्व छोट्या छोट्या गोष्टी मी पाहत होते. तू जरी वर्गात माझ्यासोबत नजर चोरत असलास तरी मी मात्र सारखी तुला पाहायची. असो चल आता मी निघते उशीर झालाय मला”. अग नको ना जाऊ थांब थोड. नाही रे अंधार होत चालला आहे जावे लागेल, तसेही मला उद्याच्या दिवसाची उत्सुकता आहे, पाहू काय करतोस तू उद्या माझ्यासाठी. असे म्हणत ती निघून गेली.

पण मला संभ्रमात टाकून गेली उद्याची उत्सुकता आहे म्हणजे काय आहे उद्या? मला काहीच कळत नव्हतं. घरचा रस्ता धरला पण डोक्यात मात्र तेच होतं की उद्या काय आहे? मोठ्या भावाच्या हातात गुलाबाच फुल पाहून आठवले अरे व्हॅलेंटाईन विक चालू आहे म्हणजे उद्या ८ जानेवारी म्हणजे प्रपोज डे आहे. कसा विसरलो मी. आज गुलाबाचे फुल तृष्णा कडून मिळाले आहे मग उद्या मनातल्या भावना संगुंच टाकतो असे मी मनाशी ठामपणे ठरवलं होतं.

आज सकाळी वेळेच्या आधीच उठलो. आई माझ्याकडे अशी काही पाहत होते की आज जगातला आठवा आजुबा घडला आहे. मी मात्र माझी सर्व कामे लवकर आटोपून शाळेत जाण्याच्या तयारीत होतो. आई आपले रेशन कार्ड कुठे आहे ग मला मिळत नाहीये? अरे कपाटात वरच्या खणात ठेवलं आहे बघ आणि तुला कशाला हवं आहे रेशन कार्ड? अग आई ते आज शाळेत सरांनी मागितले आहेतl.. कशासाठी तरी आता गेलो तिथे की सांगतील सर.

शाळेच्या बाहेरच मी तृष्णाला अडवली. थांब ना थोड बोलायचं आहे. ती आधी थोडी लाजली इकडे तिकडे पाहिले आणि जवळ येऊन उभी राहिली. बोल काय म्हणतोस? मी अलगद माझे रेशन कार्ड तिच्या हातात दिलं. ती थोडी गांगरली आणि म्हणाली रेशन कार्ड आणि ते सुद्धा मला कशासाठी? अग बघ तर उघडुन. तिने उघडुन पाहिले तर त्यात काहीच नव्हते. मी म्हटले पुन्हा चेक कर त्यात काही तरी मोठी गोष्ट आहे ती नाहीये. ती पुन्हा पाहू लागली पण तिला काहीच कळले नाही.

मी म्हणालो अग यात तुझे नाव नाहीये अजून. मला आवडेल माझ्या नावाखाली तुझे नाव लिहायला. आणि नात्याच्या कॉलम मध्ये सून म्हणून पाहायला. मला तू खूप आवडतेस अगदी पहिल्या नजेरला नजर भिडली तेव्हापासून पण कधी विचारायची हिम्मत नाही झाली. महागडं काही गिफ्ट देऊन तुला प्रपोज करण्या इतपत माझी सध्या ऐपत नाही पण नक्कीच एक दिवस तुझ्यासाठी खूप मोठी गोष्ट करेन जी अनपेक्षित असेल तुझ्यासाठी. माझं तुझ्यावर खूप म्हणजे खूप प्रेम आहे. तुझे आडनाव बदलण्याची परवानगी देशील का मला?

ती लाजली.. अलगद जवळ आली कानात हो बोलून धावत शाळेकडे वळली. मी तिच्या पाठमोऱ्या आकृती कडे फक्त न्याहाळत बसलो कारण एवढ्या महिन्यांनी माझा मनाचा बांध फुटला होता आणि तिच्याकडून सुद्धा होकार होता. पण हे सर्व करत असताना तिच्या मामाच्या मुलांनी हे पाहिलं आणि तो रागात माझ्याकडे धावत येऊ लागला.

कथेचा तिसरा भाग इथे क्लिक करून वाचा. चॉकलेट डे

कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.

लेखक : पाटीलजी (आवरे उरण)

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल