मित्र मैत्रिणींनो तुमच्यासाठी ही बातमी डोळे उघडण्याचे काम करेल कारण या बातमी मध्ये अशा एका बापाची कहाणी आहे जी ऐकुन तुमच्याही डोळ्यात पाणी येईल ही कहाणी आहे 22 नोव्हेंबर रोजी मध्यप्रदेश मधील लकी दीक्षित याचा बाईक चालवताना समोरून आलेल्या भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक ने त्याला उडवले आणि तो हे जग सोडून गेला.

जन्माला आल्यापासून ते मोठे होईपर्यंत त्या बापाने मुलासाठी सर्व काही केलेले असते पण हेल्मेट न घातल्यामुळे आपला मुलगा आपल्याला सोडून गेला हे दुःख त्याचा बाप कोणाला सांगेल. आणि म्हणूनच आपला मुलगा तर आपल्याला सोडून गेला पण आणखी कोणाच्या मुलाचा असा हकनाक बळी जाऊ नये म्हणून लकीच्या बापाने त्याच्या तेराव्या दिवशी असे काही काम केले जे वाचून तुमच्याही हृदयाचे पाणी होईल.
लकी याच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या जाण्याचे दुःख आहे म्हणून त्यांनी आपला मुलगा गेल्याने जे कारण होते तेच कारण अजुन कोणा दुसऱ्याचे आयुष्य संपवायला नको याकरिता लकीच्या तेराव्याचा दिवशी त्याच्या वडिलांनी अशा तरुण मुलांना हेल्मेट वाटले हे रोज बाईक वर प्रवास करतात शिवाय ज्या वडिलांना 1 किंवा 2 मुलं आहेत अशांना हेल्मेटचे वाटप केले आहे.