Home संग्रह वाचा या प्रोफेसरची हृदय द्रावक कहाणी मुलांसारखे राहायला आवडते म्हणून समाज चिडवायचा

वाचा या प्रोफेसरची हृदय द्रावक कहाणी मुलांसारखे राहायला आवडते म्हणून समाज चिडवायचा

by Patiljee
220 views

ही कहाणी आहे एका फैशन डिजाइन प्रोफेसरची जन्माला येताना मुलाचे रूप घेऊन आला पण आई वडिलांच्या जबाबदारीने त्याला पूर्णपणे बंदिस्त करून टाकले होते. आपल्या समाजात मुलीने मुलाचे रूप घेणे तसेच मुलाने मुलीचे रूप घेणे हे जरा जगानिराळे मानले जाते. असे केल्याने लोकांचे टोमणे कुचके बोलणे याला सामोरे जावे लागते काही लोक आपल्या मनाप्रमाणे जीवन जगण्यात आनंद मानतात तर काही लोक आपली इच्छा दाबून जगात असतात. अशीच एक कहाणी आहे प्रोफेसर ची त्याने आपली ही मनातील सर्व इच्छा जगा पुढे मांडली आहे.

तो सांगतो की घरात एकटा असताना आईची साडी आणि दागिने घालत होता शिवाय गाणे लाऊन तो नाचायचा. हे सगळं त्याला घरात एकट्याला करायला लागायचे कारण बाहेर अस केल्यास लोकांच्या वाईट नजरा खायला उठतील त्याला स्वतःबद्दल लोक काय बोलतील याची जास्त काळजी होती. पण जेव्हा तो मोठा झाला तेव्हा त्याच्यासाठी आणखी एक अडचण आली ती म्हणजे तरुण झाल्यावर मुलाचे आवाज जाडे भरडे होतात पण त्याचा आवाज कोमल राहिला त्याला आवाजामुळे लोकांचे टोमणे खावे लागत होते. ज्या गोष्टीला तो लोकांपासून लपवत होता तीच गोष्ट त्याच्या आवाजावरूचे न लोकांसमोर येत होती.

जेव्हा तो सातवीत होता त्यावेळी त्याच्या मित्रांनी त्याला छक्का म्हणून चिडविले होते तेव्हा त्याच्या लक्षात आले नाही की मी ह्याच्यावर काय बोलू. नातेवाईक ही घरी आल्यावर त्याच्या चालचलान आणि बोलण्यावरून त्याला चिडवायचे त्याचे आई वडील पण त्याची बाजू नाही घ्यायचे. स्वतच्या घरी त्याचा श्वास कोंडायला लागला होता. जेव्हा तो कॉलेजला जायला लागला तेव्हा त्याला एलजीबीटीआईक्यू प्लस ग्रुप बाबत माहिती मिळाली तेव्हा त्याला कळले की मुलीबद्दल त्याच्या मनात तसे काहीच नाही आहे कारण मी सुद्धा एक किन्नर आहे. त्याच्याबद्दल त्याने त्याच्या मित्रांना सांगितले त्याच्या मित्रांनी ही त्याच हे अस्तित्व सेलिब्रेट केले आणि त्याला त्या ही अवस्थेत स्विकारले.

पण त्याच्या आई वडिलांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी साइक्रेटिस्टची तपासणी चालू केली त्याला वाटले ती आपल्या मुलावर मुलगी होण्याचे भूत बसले आहे. त्यानंतर 25 वर्षं या सगळ्यांशी लढा देताना त्याला कळले की आता तो जिंकला आहे. त्याला आता कळले होते मी आहे तसा समाजा पुढे येणार आणि इथून त्याने त्याला आवडेल त्या गोष्टी विकत घेण्यास सुरुवात केली आणि फॅशन डिझाईनचा कोर्स सुरू केला. त्यानंतर प्रोफेसर म्हणून कितीतरी वर्ष त्याने फैशन डिजाइनिंग म्हणून मुलांना शिकवले आणि आज तो लाईफ मधे सक्सेस आहे. मुलं त्याची रिस्पेक्ट करतात आता सगळं काही बदललं आहे लहान असताना त्याला स्वतःला ओळखता आले नाही पण इतकं माहीत होत की मी पुरुष नाही फक्त पुरुषा सारखा जन्माला आलो आहे.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल