Home हेल्थ उपवास करताना तुम्ही नेमके कशाप्रकारे करता आणि काय खाता?

उपवास करताना तुम्ही नेमके कशाप्रकारे करता आणि काय खाता?

by Patiljee
654 views

एकादशी आणि दुप्पट खाशी म्हण तुम्हाला माहीतच असेल यामागे म्हणीचा अर्थच असा आहे की तुम्ही उपास धरता पण त्यामध्ये फराळाचे आपल्या पोटात रोजच्यापेक्षा जरा दुप्पटच जाते. आपल्याकडे वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येकजन धर्मानुसार उपवास पकडत असतो. त्यातल्या त्यात जास्त उपवास हे हिंदू धर्मात असतात आणि बहुतेक लोक उपवास आवर्जून धरतात. त्यांना विचारलं का धरता तुम्ही उपवास? आता तुमचं वय झाल आहे? नाही होणार उपास तुम्हाला? तर यांची वेगळीच उत्तर असतात म्हणजे ” हो आम्ही लहान पणापासून उपास पकडत आलोत, आमच्या आई वडिलांनी पण पकडले आहेत मग असे सोडून देणे चुकीचे आहे ना.” हे असे त्यांचे म्हणणे असते.

अनेक देवदेवता त्यांचे उपास नवरात्र, रामनवमी, हनुमानजयंती, जन्माष्टमी, गणेशजयंती असे अनेक उपवास, याखेरीज महाशिवरात्र, आषाढी आणि कार्तिकी एकादशी, प्रत्येक महिन्याला येणारी चतुर्थी, दोन एकादशा , याशिवाय सोमवार ते रविवार यांपैकी असा कोणताही एक वार, अशी ही न संपणारी उपवासाचे दिवस असतात.

काही लोक धरतात उपवास त्यागील त्यांची कारणे ही वेग वेगळी असतील. काही लोक वजन कमी करण्यासाठी म्हणून खास उपास करत असतात यांच्यासाठी उपास हा योग्य पर्याय आहे का ? तर नाही त्यापेक्षा तुम्ही योग्य तो आहार घ्या फ्रुट खा, ज्युस प्या, भाज्या खा, उकडलेलेल पदार्थ खा त्यामुळे तुमचं वजन कमी होईल पण उपासाचे पदार्थ खाल्यामुळे कदाचित त्यामुळे तुमचे वजन कमी न होता आणखी वाढू शकते. काही लोक एकदम निर्जल उपवास पकडतात पण कधी विचार केला आहे का की असा उपवास पकडणे तुमच्या शरीराच्या दृष्टीने घातक असू शकतो.

आठवड्यातून एक दिवस उपास करणे म्हणजे दिवसभर उपास आणि संध्याकाळी जेवणे पण जेवणे याचा अर्थ असा नाही की तुम्ही मिळेल ते अरबट चरबट खाणे संध्याकाळचे जेवण हे अगदी हलके असावे जेणेकरून दिवसभराच्या उपावासाने पोटाला काही अपाय होऊ नये.

उपवासाला तुम्ही काय खाता बरं तर साबुदाण्याची खिचडी, बटाटा वेफर्स, बटाटा चिवडा, साबुदाणा वडा, राजगिरा चे पदार्थ हे सगळं पचवणं ही तितकच कठीण आहे. पण तरीही लोक हेच खाणार आपल्या देशात वेगवेगळ्या ठिकाणी उपवासाला वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात म्हणजे काही ठिकाणी एक पदार्थ आवर्जून खाल्ला जातो. पण दुसऱ्या ठिकाणी हा पदार्थ नाही खाल्ला जात.
उपवासाचे सगळे पदार्थ खाऊन पित्त वाढते, बटाटे खाऊन पोट गुबारते, गच्च होते. त्यामुळे उलट नेहमीचं जेवण परवडलं असं आपलं पोट म्हणत असेल.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल