सध्या उन्हाचा सीजन पाहता कडक उन्ह आणि या उन्हात काही जणांना उन्हाळा लागतो. आता उन्हाळा लागतो म्हणजे काय हे सांगायची तुम्हाला गरज नाही पण आपण जास्त उन्हातून फिरलो की हा त्रास होऊ शकतो. यातील कित्तेक जणांना हा त्रास दरवर्षी होत असेल आणि यामुळे खूप त्रास ही होतो. लघवीला जळजळ होणे, किंवा थोडी थोडी राहून राहून लघवीला होणे, तिचा रंग पिवळसर होतो. लघवी करताना त्या जागी आग होते काही वेळा तर मुत्र द्वारे रक्त जाणे असा त्रास होत असतो.
या उन्हाळ्यात खूप जास्त घाम येत असतो आणि या घामामुळे आपल्या शरीरातील पाणी हे बाहेर फेकले जाते अर्थात पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे आणि त्यामुळे मुत्रा मध्ये अम्लीय पना जास्त होतो त्यामुळे उन्हाळे लागतात.
पहिल्यांदा आपण भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात तशीही पाण्याची खूप जास्त गरज असते आपल्या शरीराला त्यामुळे भरपूर पाणी पित जा.
नारळाचे पाणी ही यावर उत्तम आहे. त्यामुळे रोज नारळाचे पाणी पिले तर ते तुमच्या शरीरासाठी ही चागळेच आहे. शिवाय कलिंगड ही खाऊ शकता, किंवा कलिंगडाचा रस प्या यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघेल. कोकम सरबत प्या कच्चा आंब्याचे पन्हे करून प्या. वाला घातलेले मठातील थंड पाणी पिया हे ही यावर उपयुक्त आहे.
शिवाय जेवताना काकडीचा जात उपयोग करावा, शुद्ध निरा पिणे ही यावर प्रभावी आहे. लिंबाचा रस करून प्यावे त्यासाठी लिंबाच्या रसात खायचा सोडा घाला आणि प्या. शिवाय धने भिजत घातलेले पाणी साखर टाकून प्या आराम मिळेल.
जास्त त्रास होत असेल म्हणजे लघवी मधून रक्त जात असेल तर डॉक्टरांकडे जावे.