Home कथा त्या रात्रीचा अनुभव

त्या रात्रीचा अनुभव

by Patiljee
1616 views

माझा खरं तर कोणत्याही नकारात्मक शक्तींवर विश्वास नाही म्हणून मी रात्री अपरात्री कुठेही फिरायचो. माझ्या घरची मला खूप ओरडायची, माझ्यावर चीडायची, “इतक्या रात्री बाहेर जाणे अजिबात चांगले नाही, एक दिवस तुला काहीतरी दिसेल ना तेव्हा तुझे दिले उघडतील”, पण तरीही मी अधिक जोमाने बाहेर फिरायचो, मी फिरायचो म्हणजे मला बाईक रायडिंगचा खूप शोक होता म्हणून मी कधीही बाईक काढायचो आणि बाहेर फिरायला निघायचो.

माझ्या आईने तर माझ्या गळ्यात एक बाबा कडून ताईत आणून बांधला होता. म्हणाली हा ताईत काढलास तर माझं मेलेल तोंड बघशील म्हणून, काय करणार आईची माया तिची तीच हे असे वागणे अपेक्षित होते पण माझ्या मनात मात्र त्या ताईत बद्दल काहीच अशा भावना नव्हत्या, तरीही अंगावर ओझ म्हणून ती ताईत मी गळ्यात घातला होता.

आजही मी माझी बाईक काढली आणि बाहेर फिरायला निघालो. रात्रीचे दहा वाजले होते, आई म्हणाली “बाळा आज बाहेर नको रे जाऊस, आज अमावशा आहे” तिच्या ह्या बोलण्यावर माझे हसू मला आवरत नव्हते, हे पाहून बाबा माझ्यावर आणखी रागावले म्हणाले तुला तुझी काळजी नाही तर आम्ही काहीच करू शकत नाही, जा बाबा जा तू तुझे नशीब तुझ्या पुढे, असे म्हणून आई आणि बाबा घरात निघून गेले. ते घरात गेले असले तरी माझ्या मनात एक वेगळीच भीती टाकून गेले ती म्हणजे आज आमावशा आहे.

त्यांच्या प्रत्येक गोष्टीला मी जरी मानत नसलो तरी आज माझ्या मनात थोडी भीती निर्माण झाली होती खरं, पण तरीही भूत बित काही नसत अस म्हणत म्हणून बाईक स्टार्ट केली आणि निघालो. बॅग पाठीवर टाकली, त्यात थोडे कपडे ही घेतले होते म्हणजे कुठेतरी वस्ती करायची आणि निघायचं पुन्हा फिरायला, फिरायला म्हणजे मी नुसताच फिरत नसे तर माझा एक युट्यूब चॅनल होता. त्यावर मी माझे व्हिडिओ टाकत असे. आता म्हणाल रात्री का तर रात्रीच जग मी लोकांना दाखवतो त्यांना सांगतो बघा रात्री किती शांतता आणि मनाला भावणारी दुनिया असते. पण माझ्या घरातल्यांना हे कोण सांगणार?

आता मला वाटते गाडी वर बसून मला दिढ तास झाला म्हणजे जवळ जवळ साडे अकरा झाले असतील तेव्हा वातावरण थोडे शांत पण भयानक वाटत होते, कारण सध्या जातोय तो रस्ता खूप सून सान, खतरनाक होता, खतरनाक यासाठी म्हणेन की त्या ठिकाणी भरपूर अपघात झालेले आहेत. पण हा रस्ता आज मला जरा जास्तच भयानक वाटायला लागला आहे. कारण नेहमी असणारी शांतता आज इथे अजिबात दिसत नव्हती. मी पहिले दोन वेळा या रस्त्याने आलेला आहे पण त्यावेळी सगळं व्यवस्थित होत. आता अस वाटेत आहे की वीस तीस जन एकमेकांसोबत कुजबुजत आहेत, पण मागे पुढे आणि सगळीकडे पाहिले इथे कोणीच दिसत नाही.

मग हा इतक्या जनांचा बोलण्याचा आवाज येतोय तरी कुठून म्हणून मी बाईक थांबवली आणि थोडा वेळ बाईक वरच बसून आजूबाजूला कोणी आहे ते पाहिले, समोरच एका दगडावर एक बाई बसलेली होती काळोख होता म्हणून तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. पण साडी घातलेली म्हणून बाई होती हे खरे, वाटलं तिला विचारावं कुठ जायचं असेल तर सोडतो, म्हणून मी विचारायला तिच्या जवळ जात होतो.

जसं जसा जवळ जात होतो वातावरण मधील गारवा अधिक वाढला होता. म्हणजे मला जशी काय थंडी वाजू लागली होती, लागलीच कुत्र्याचे ते केविलवाणे रडणे ते ऐकुन तर माझ्या पोटात गोळाच आला, चिट पाखरू ही ज्या ठिकाणी दिसत नाही अशा ठिकाणी अनेक लोकांचे बोलणे आणि रडणे कानावर येत होते. त्यांचे ते केविलवाणे आवाज हृदय चिरत होते, त्या बाईच्या थोड जवळ पोहचलो होतो पण तिने डोक्यावरून पदर घेतला होता तरी हिम्मत करून मी तिला विचारले तुम्हाला कुठे जायचे आहे का ? तिने काहीच उत्तर दिले नाही. मी पुन्हा विचारले ओ बाई तुम्हाला कुठे जायचे असेल तर सोडतो मी? इतकं बोलण्यात आणि तिच्या डोक्यावरून पदर खाली पाडण्यात एकच वेळ, तिचा चेहरा पहिला आणि माझ्या पूर्ण अंगाचे पाणी झाले. आज पहिल्यांदा असा चेहरा पहिला आणि माझे धाबे दणाणले.

संपूर्ण जळालेला तिचा चेहरा, डोळे खोबणी तून बाहेर येऊन लटकत होते, डोक्यावरचे केस ही जळालेले होते काही ठिकाणी केस तर काही ठिकाणी टक्कल दिसत होत, सोबत तिच्या गुर्गुरण्याचा आवाज खूपच विचित्र होता तो आवाज. एक हात गाळून पडला होता शिवाय चेहऱ्यावरचा काही भाग जळून गळाला होता, खूप विचित्र तीच ते रूप, पाहूनच मला त्यावेळी उलटी सारखं झालेलं हे तीच ते विद्रूप रूप पाहताना मला फक्त काही सेकंद लागले आणि ती माझ्या जवळ येऊ लागली, ती जसजशी जवळ येत होती माझी धडधड वाढायला लागली, काय करू हे समजत नव्हते, आई बाबांची आठवण आली तेव्हा आईने दिलेला तो धागा गळ्यात होता हे हात लावून पाहिले तर धागा गळ्यात नव्हता? आता तर मला माझे मरण डोळ्यासमोर दिसू लागले.

माझ्या गळ्यातील धागा गेला कुठे येताना तर गळ्यात होता. ती बाई आता जास्तच जवळ आली होती. मी धावत जाऊन बाईकवर बसलो आणि हेल्मेट सिटवर होता तो घालण्यासाठी आता माझ्याकडे वेळ नव्हता पण पटकन लक्षात आले हेलमेटला काहीतरी तरी लटकले आहे. इतक्यात ती बाई अगदीच माझ्या जवळ आली आणि तिचा हात त्याला फक्त हाडे शिल्लक होती. वाटलं आता सरळ माझ्या छातीच्या आरपार जाईल पण तितक्यात तो ताईत माझ्या हातात आला आणि एका झटक्यात ती बाई लांब वर जाऊन फेकली आणि गायब झाली. आता तर घामानी माझे सर्व अंग भिजले होते. एका क्षणात गाडी स्टार्ट केली आणि निघालो मागेपुढे कुठेच पाहिले नाही. अजूनही वेगवेगळे आवाज माझ्या कानात घुमत होते वाटत होते त्या ठिकाणी अजुन बरेच असे आत्मे आहेत त्यामुळे मला तरी या ठिकाणी एक क्षण ही थांबून जमणार नाही. एक संकट जरी गेले होते तरी वाटेत मला कोणी ना कोणी भेटत होते. कधी म्हातारा तर कधी कधी तरुणी तर कधी लहान मुले पण एकदा मला चांगलीच अद्दल घडल्यामुळे मी गाव येईपर्यंत थांबलो नाही. शेवटी एक अर्ध्या तासाने एक गाव लागले आणि तिथे शिरलो त्या गावात ही रात्री कोणी चिटपाखरू दिसत नव्हते. शेवटी एक मंदिर दिसले तिथं जाऊन रात्र काढली.

इथे क्लिक करून ही कथा व्हिडिओ रुपात पाहा.

आज मी माझ्या आई मुळे जिवंत आहे तिने दिलेला धागा आज माझ्या जिवंत असण्याचा पुरावा आहे. आता मी शुटींग करतो पण सकाळी रात्री मात्र अजिबात बाहेर पडत नाही. म्हणतात ना एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी त्याचा सामना व्हावा लागतो माझेही तसेच झाले.

लेखक : पाटीलजी आवरे उरण, रायगड

ह्या पण Horror कथा वाचा.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल