तुरटीचा उपयोग पाणी शुद्ध करण्यासाठी केला जातो. जास्त करून पावसाळ्यामध्ये जेव्हा पाणी जास्त गढूळ असते त्यावेळी त्या पाण्यात तुरटी फिरवली जाते आणि पाणी स्वच्छ केले जाते तुरटी पांढरा तसेच लाल या फोन रंगाची असते पण जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाच्या तुरटीचा उपयोग केला जातो. तुरटी ही तुम्हाला कोणत्याही किराणाच्या दुकानात मिळते शिवाय तिची किंमत ही कमी असते. या तुरटी चे आपल्या जीवनात आणखी ही फायदे आहेत ते कदाचित तुम्हाला माहीत नसतील.
तुम्हाला नेहमीच घाम येत असेल तर तुरटीचा उपयोग तुमच्यासाठी खास आहे. तुम्ही जेव्हा अंघोळ करता तेव्हा त्या पाण्यात तुरटी फिरवा आणि त्या पाण्याने अंघोळ करा.
दात दुखत असतील तर तुरटी मध्ये काळी मिरीची पावडर मिक्स करून त्या ठिकाणी दुखणे बंद होईल, शिवाय रोज दोन वेळा तुरटी गरम पाण्यात घोळून त्या पाण्याने गुरळ्या करा त्यामुळे दाताचे दुखणे निघून जाईल
तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल तर यावर ही तुरटीचा उपयोग गुणकारी आहे. त्यासाठी तुरटीची बारीक पावडर करा आणि तीच मधासोबत चाटण करा तुम्हाला फरक पडेल.
तुम्हाला जखम झाली असेल आणि त्या मधून येणारे रक्त थांबत नसेल तर यासाठी तुम्ही तुरटी च्या पाण्यात जखम झालेला भाग बुडवा आणि तुरतीची पुड जखमेवर लावा.
तसेच तुरटीच्या पाण्याने केस धुतल्यास तुमच्या डोक्यात असणाऱ्या उवांचा नाश होतो.
तुमच्या चेहऱ्यावर सतत मुरूम येत असतील तर हा उपाय करा, मुलतानी माती, अंड्याचा पांढरा भाग व तुरटीचे मिश्रण फार परिणामकारक आहे हे मिश्रण चेहऱ्याला लावा.
तुमच्या त्वचेवर लवकर सुरकुत्या पडायला लागल्या आहेत का मग तुरटी घ्या ती पाण्यात भिजवा आणि तोंडावर फिरवा थोड्या वेळाने चेहरा धुतल्यानंतर त्यावर मॉश्चराजर लावा.