Home करमणूक भारतीय सिनेमातील पहिली कॉमेडी महिला टुन टुन बद्दल ह्या गोष्टी नक्कीच जाणून घ्या

भारतीय सिनेमातील पहिली कॉमेडी महिला टुन टुन बद्दल ह्या गोष्टी नक्कीच जाणून घ्या

by Patiljee
454 views

भारतीय सिनेमात असे अनेक कलाकार आहेत जे आपल्या अभिनयाने ओळखले जातात. सिनेमात जरी मुख्य नायक नायिका किंवा खलनायक महत्त्वाचा असला तरीही सिनेमाला बांधून ठेवण्याचे काम कॉमेडी कलाकार करत असतात. तुम्हाला सिनेमा पाहताना कंटाळा यायला नको म्हणून अनेक कलाकार आपल्या अभिनयाने तुम्हाला हसवत असतात. असे म्हणतात लोकांना रडवणे खूप सोपं असतं. पण कठीण असतं ते लोकांना हसवणे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत. ज्यांनी खऱ्या अर्थाने भारतीय सिने सृष्टीत पहिली महिला हास्य कलाकार म्हणून पाऊल ठेवलं होतं.

टुन टुन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या उमा देवी सर्वानाच माहित असतील. पण सिनेमात येण्या अगोदर त्यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढले आहेत. ११ जुले १९२३ मध्ये अमरोहा ह्या उत्तर प्रदेश मधील छोट्याश्या गावात त्यांचा जन्म झाला. जेव्हा त्या अडीच वर्षाच्या असताना जमिनीच्या वादातून त्यांचा आई वडील भाऊ ह्यांना मारण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्या अंगावरील छत्र हरवून बसलं होतं. एका मुलाखतीत बोलताना त्या म्हणाल्या होत्या की मला माहित नाही माझे आई बाबा कसे दिसायचे, ते गेल्यानंतर मला माझ्या काकांनी लहानाचे मोठे केले, मी लोकांच्या घरची धुणभांडी करून बालपण व्यतीत केलं आहे.

लहानपापासूनच त्यांना गायनाची खूप आवड होती. पण परिस्थितीमुळे त्या हतबल होत्या. अखेर त्यांनी आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय घेतला. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी ट्रेन पकडून त्यांनी मुंबई गाठली. इथे त्यांची ओळख अभिनेता निर्माता अरुण अहुजा आणि गायिका निर्मला देवी ह्यांच्या सोबत झाली. अभिनेता गोविंदा ह्यांचे ते आई वडील आहेत. त्या दोघांनी त्यांना अनेक निर्मात्यांसोबत भेट घालून दिली. एक दिवस त्यांची भेट संगीतकार नौशाद अली यांच्यासोबत झाली.

नौशाद अली ह्यांनी टुन टुन ह्यांना गाण्याची पहिली संधी मिळवून दिली. वकिम आझरा ह्या सिनेमातून त्यांनी पहिलं गाणं गायलं. ह्यानंतर त्यांच्या गायकीने अनेकांना घायाळ करून सोडलं. त्यांनी पुढे जाऊन अनेक सिनेमात गायन केले. आणि त्यांची बरीच गाणी हिट सुद्धा ठरली. गायनात त्यांचा चांगला जम बसला असताना नौशाद ह्यांनी त्यांना अभिनय क्षेत्रात सुद्धा उतरण्याचा सल्ला दिला. कारण त्यांच्यामते टुन टुन ह्यांचे व्यक्तिमत्व हसमुख, सर्वांना हसवणारे होते.

१९५० मध्ये त्यांनी अभिनय क्षेत्रात दिलीप कुमार यांच्यासोबत बाबुल सिनेमातून पदार्पण केलं. ह्या सिनेमात त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडले. ह्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात १९८ सिनेमे केले. पहिली महिला हास्य कलाकार म्हणून सुद्धा त्यांची ओळख झाली. टुन टुन सिनेमात असणार म्हणजे मनमुराद हसायला मिळणार हे जणू समीकरणच तयार झाले होते.

त्यांना चार मुलं आहेत. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी २४ नोव्हेंबर २००३ मध्ये शेवटचा श्वास घेतला. एवढ्या दिग्गज अभिनेत्री बद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. लोकांना त्यांच्या बद्दल कळावं म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न होता.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल