मित्रांनो तोंडातून लाळ गळणे किंवा घोरणे ही समस्या आपल्यापैकी कितीतरी जणांमध्ये अस्तित्वात असेल आणि या सवयी मुळे कधी कधी खूप लाजिरवाणे व्हायला होत असेल पण खरं तर हा कोणता आजार नाही की यापासून तुम्ही बरेच होऊ शकत नाही तर आपण आज यावरील असे उपाय पाहणार आहोत ज्यामुळे या समस्यांपासून तुम्ही लवकर स्वतःची सुटका करून घ्याल.
लाळ गळण्यावर उपाय
बघा प्रत्येक व्यक्तीमध्ये तोंडातून लाळ गळण्याची वेगवगळी करणे असू शकतात. काही लोकांना नाकाशी संबधित एलर्जी तर काहींना खाद्यपदार्थ यांमधून होणारी एलर्जी, यामुळे तोंडात जास्त प्रमाणत लाळ निर्माण होते. तर काहींना एसिदिटीच्या समस्येमुळे अधिक लाळ निर्माण होत असते. आपल्या शरीरामध्ये लाळ बनवणाऱ्या वेगळ्या ग्लैंड्स असतात. ज्यामुळे रात्री झोपल्यावर आपल्या तोंडात अधिक लाळ निर्माण होत असते.
तुम्ही रोज आपल्या तुळशीची 2 ते 3 पाने चावून खा. त्यामुळे तुमची या समस्येपासून सुटका होईल. तुमच्या घरात जर तुरटी असेल तर तुरटीच्या पाण्याने गुळण्या करा. तसेच जेवून झाल्यानंतर आवळा पावडर खा आणि वरून पाणी प्या. दिवसातून एक किंवा दोन वेळा दालचिनीचा चहा प्या यामुळे तुमची ही समस्या नक्की दूर होईल.
घोरण्याचा समस्येवर उपाय
पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना घोरण्याची समस्या आहे अशा लोकांनी झोपताना पहिल्यांदा डाव्या बाजुला कुस करून झोपावे. त्यामुळे तुमचे घोरणे कमी होईल.
तसेच रात्री झोपताना कोमट पाणी प्यावे आणि मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्या. त्यामुळे घशात काही समस्या असेल तर दूर होईल.
त्याचप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमचे नाक स्वच्छ करून झोपवे त्यामुळे नाकातील सर्व घाण निघून जाईल जेणेकरून तुमच्या झोपण्यात आडकाठी येऊ नये.
त्याचप्रमाणे झोपण्यागोदर एक चमचा मध खा त्यामुळे तुमचा गळा आणि श्वास नलिका यांमध्ये झोपल्यानंतर कोणतीही अडचण येणार नाही.