आपण कुठेही बाहेर फिरायला गेलो, सिनेमा पाहायला गेलो किंवा शॉपिंग साठी गेलो, तेव्हा झालेले बिल भरण्यासाठी तिथे आपला कार्ड किंवा कॅश तर देतोच पण तुम्ही एक गोष्ट आवर्जून नोटीस केली आहे का? शक्यतो तुम्ही आम्ही ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो किंवा ती गोष्ट कळून सुद्धा त्यात काय एवढं फरक पडणार आहे? असे तुम्ही विचार करता. तर मित्रानो ती गोष्ट म्हणजे कोणतेही बिल भरताना तिथल्या काउंटरवर जो कुणी मुलगा किंवा मुलगी असते ती तुम्हाला आवर्जून म्हणजे सर आपला मोबाईल नंबर सांगा, आणि दुसऱ्या क्षणार्धात तो नंबर आपण तिला किंवा त्याला सांगून टाकतो.
आता तुम्ही म्हणाल की नंबर दिल्याने एवढे काय होत? मित्रानो गोष्ट खूप छोटी आहे पण ह्याचा खोलवर अभ्यास केला तर तुम्हाला त्याची सत्यता पडताळून पाहता येईल. यापुढे नक्कीच तुम्ही केव्हाही बिल पे केल्यावर नंबर दिल्यानंतर तुमच्या मोबाईलवर त्वरित एक मेसेज येईल. बिल पे केल्याबद्दल तुमचे धन्यवाद आमच्या इथे येऊन तुम्ही जे काही खरेदी केले आहे त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. यापुढेही आम्हाला अशीच संधी देत रहा. ह्याच मेसेजच्या खाली त्यांची वेबसाईटची लिंक असते.
एकदा का तुमचा नंबर त्यांच्या सिस्टिममध्ये सेव्ह झाला की रोज तुम्हाला त्यांच्या जाहिरातीचे मेसेज यायला सुरुवात होते. आमची ही ऑफर चालू आहे, एकावर एक गोष्ट फ्री आहे, अशा अनेक ऑफर देऊन तुम्हाला आमिष दिले जाते. आपल्यापैकी बरेचजण ह्या अमिषाला बळी पडून त्या लिंकवर जातात. ह्यामुळे ह्या कंपनी वाल्यांचा फायदा असतो. तुम्हाला नक्कीच थोड कुठेतरी ही गोष्ट आता क्लिक झाली असेल. ही एक प्रकारची अशा मोठ्या कंपनीची मार्केटिंग स्किल्स असते आणि आपल्याला फे कळत नाही.
हे थांबण्यासाठी तुम्ही काय कराल?
ह्यासाठी तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट करा ती म्हणजे यापुढे कुणीही शॉपिंग मॉल, सिनेमागृह, वॉटरपार्क, हॉटेल, साडी सेंटर अशा अनेक ठिकाणी मोबाईल नंबर मागितला तर सरळ नाही म्हणून सांगायचं. असे सांगितल्यावर बघा तुम्हाला परत प्रश्न नाही करणार ते. सुरुवात स्वतःपासून करा बघा नक्कीच बदल घडेल.