Home विचार कोणत्याही गोष्टीचा तुम्ही जास्त विचार करता? मग हे लिखाण तुमच्यासाठी आहे

कोणत्याही गोष्टीचा तुम्ही जास्त विचार करता? मग हे लिखाण तुमच्यासाठी आहे

by Patiljee
982 views

आताच्या काळात मनुष्याचे जीवन इतके धावपळीचे झाले आहे की त्याला कसलीच उसंत नसते. अगदी दोन घास चवीने खायची सुद्धा, पण याच माणसाला विचार करायला मात्र भरपूर वेळ असतो. पण तो विचार करण्यासाठी त्याला कोणतेही कारण पुरेसे असते. कामाला जाणाऱ्या व्यक्तीला कामाचे विचार जास्त घेरलेले असतात. त्याला घरी आल्यावर ही तेच विचार डोक्यात असतात. त्यामुळे तो मनुष्य कधीच आनंदी राहू शकत नाही. कारण त्याच्या मेंदूमध्ये सतत ते विचार येत असल्यावर दुसरा कोणताच क्षण त्याच्यासाठी महत्वाचा नसतो.

शिवाय घरातल्या स्त्रियांना सुद्धा घरातील टेन्शन असतात आणि त्यामुळे त्या ही सतत विचार करत असतात पण जास्त विचार करणे हा मानसिक आजार आहे हे तुम्हाला माहीत आहे का? काही लोक वारंवार विचार करतात पण काही लोक त्यावर लगेच कृति करतात. सतत अस्वस्थ वाटणे, हुरहुर वाटणे ही भावनिक लक्षणे असतात तशीच हृदयातली धडधड वाढणे, धाप लागणे, हातापायाला कापरे सुटणे, घाम फुटणे व पोटात गोळा येणे या प्रकारचे लक्षण दिसून येतात. चिंतित मनाला झोप येत नाही. तळमळणे, सोबत श्वास अडकतो. रात्री झोपेत ही स्वप्ने पडतात ज्याचा आपण दिवसभर मनात विचार करत असतो.

आयुष्यात असे काही क्षण येतात त्यांना सामोरे जाताना मनुष्याला कधी कधी भावनिक होताना पाहिले असेल, त्यावेळी त्याच्या मनात खूप नकारात्मक विचार येत असतात, मन चिंताग्रस्त होते, मनाविरुद्ध गोष्टी घडत असतात या गोष्टी अचानक पने आपल्या आयुष्यात घडत असतात, त्यामुळे तुमचे मन चिंतेने घुटमळू लागते. या मध्ये पुरुषाच्या पेक्षा हा आजार स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणत दिसून येतो. त्याचे नंतर जास्त प्रमाण झाल्यावर त्यांना पॅनिक अटॅक येण्याचा धोका असतो.

अशा वेळी आपणच आपली समस्या सोडवू शकतो जेव्हा असे वाटेल आपल्या चिंता जाणवू लागली आहे त्यावेळी आपले मन एकाकी असते. आपल्या मनातील भावना कोणाकडे तरी व्यक्त करा त्यासाठी मित्रपरिवार जोडा त्याच्याजवळ मन मोकळे करा. तुम्हाला थोड का होईना बरं वाटेल.

तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही कोणतीही गोष्ट करायला जाता आणि ती यशस्वी होत नाही तर यासाठी दुःख करू नका. त्यामुळे काहीच होणार नाही. वारंवार प्रयन करा, मनात धैर्य ठेवा ती गोष्ट तुम्हाला यशस्वी करायचीच आहे तर ती तुम्ही नक्कीच कराल.

मनात सतत नकारात्मक विचार येत असतील तर त्यांचा नायनाट करा. त्यांच्यामुळे तुम्ही मागे पडता मनात सतत सकारात्मक विचार करण्याची धमक ठेवा आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात ही सकारात्मक घडले जाईल.

तुमची जर देवावर श्रद्धा असेल तर जो देव तुम्हाला जास्त प्रिय आहे अशा देवाचे नामस्मरण करा. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमच्या मनात सतत विचार येत असतात तेव्हा हा उपाय करून बघा.

तुम्हाला जेथे आवडते तेथे फिरायला जा किंवा आवडते पुस्तक वाचा, गाणी ऐका त्यामुळे कदाचित तुमची चिंता कमी होईल.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल