पाणी हा घटक्त माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे आणि रोज आपल्या शरीराच्या गरजेनुसार पाणी पिणे आवश्यक आहे. पण पाणी पिण्यासाठी काही नियम ही आहेत. ते नियम जर तुम्हाला माहीत नसतील तर पाणी पिण्याने तुमच्या शरीराला नुकसान ही होऊ शकतात. हे नुकसान पाणी पिल्यामुले झाले आहेत हे सुध्दा तुम्हाला माहीत नसते. चला तर मग जाणून घेऊया असे काय नुकसान होतात.
पहिली गोष्ट पाणी कधी प्यावे? उगाचच हाताला मिळाले म्हणून कधीही पाणी पिवू नये. त्यासाठी तुम्हाला तहान लागणे ही गरजेचं आहे आणि म्हणून जेव्हा तुम्हाला तहान लागते तेव्हाच पाणी प्या. जेव्हा तहान लागते तेव्हा शरीर आपल्याला संकेत देतो. तेव्हाच आपण पाणी प्यायला हवे. पाण्यामुळे आपल्या शरीरातील मल,मुत्र हे कार्य उत्तमरित्या पार पडते त्यामुळे गरज असेल तेव्हा पाणी पिणे हे योग्य आहे.
प्रत्येक मोसमात पाण्याची गरज कमी जास्त पडू शकते. पावसाळ्यात पाण्याची गरज तशी कमी पण उन्हाळ्यात तीच गरज जास्त पडते. काही लोक पाणी पिताना खूप घाई करतात तर जास्त घाई करू नये आरामात एका ठिकाणी बसून पाणी प्यावे. आता तुम्ही म्हणाल तितका वेळ नसतो आताच्या काळात पण आपल्या पाणी प्यायला इतका जास्त वेळ ही लागत नाही की तो तुमच्याकडे नाही. काही लोक पाणी पिताना ग्लास चार पाच बोट लांब ठेऊन मग घटा घटा पाणी पितात पण तसे पाणी पिणे ही आपल्या शरीराच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे दोन घोट यातील अंतर मध्ये हवेचे बुडबुडे शिरतात आणि त्यामुळे पोट गच्च होते आणि त्याचा परिणाम सारखे ढेकर येत असतात.
उभे राहून पाणी पिऊ नये. त्यामुळे पाणी पिताना ते सरळ पोटाच्या खालच्या भागात जाते आणि म्हणून आपण जे दिवसभर खातो त्या पदार्थांना पोषक घटक मिळत नाहीत त्यामुळे तुम्हाला अशक्तपणा ही येऊ शकतो.
पाणी पिताना कधीही छोट्या ग्लास मध्ये घेऊन ते प्यावे. मोठ्या भांड्यात पाणी घेऊन पील्याने तुमची पाणी पिण्याची गती ही वाढते आणि म्हणून पाणी हे नेहमी हळू हळू प्यावे. ज्यामुळे तुमची पचन शक्ती वाढते पाणी पिताना एकच श्वासात पाणी पिऊ नये त्यासाठी प्रत्येक घोटाळा त्या पाण्याची चव कळायला हवी याप्रमाणे हळुवार पाणी प्यावे.
जेवल्यानंतर ही आवश्यक असेल तितकेच पाणी प्या जास्त पाणी पिण्याने ही पचनसंस्था बिघडते तसेच कमी पाण्याने ही पचनाला त्रास होतो.