Home हेल्थ तुम्ही सुद्धा टाकून देत असाल ना फ्लॉवरची पाने मग चुकी करताय

तुम्ही सुद्धा टाकून देत असाल ना फ्लॉवरची पाने मग चुकी करताय

by Patiljee
484 views

तुम्ही फ्लॉवरची भाजी खातच असाल कधी मटार मध्ये घालून तर कधी नुसती फ्लॉवरची भाजी ज्यांना फ्लॉवरची भाजी आवडते त्यांना हा फ्लॉवर कोणत्याही भाजीत घालून खायला आवडतो. पण तुम्ही भाजी करताना फक्त फ्लॉवर वापरता आणि त्याची बाजूची पाने फेकून देता. पण तुम्हाला माहीत आहे का या फ्लॉवरच्या पानात इतके जास्त गुणधर्म असतात की ज्यामुळे खरोखर तुमच्या शरीराला आवश्यक असणारे गुणधर्म मिळतात.

फ्लॉवरच्या पानात खूप जास्त प्रमाणात कॅल्शिअम असते आणि कॅल्शिअमची गरज तर आपल्या प्रत्येकाला असते. कॅल्शिअम मुळे आपल्या शरीरातील हाडे मजबूत आणि निरोगी राहतात हे सर्वानाच माहीत आहे. त्यामुळे खरंच ज्या लोकांना कॅल्शिअमची कमतरता जाणवते त्यांनी ही ह्या पांनाचा ही भाजीत समावेश करावा.

फ्लॉवरच्या पानात आयर्न ही मोठ्या प्रमाणात पाहिले जाते. त्यामुळे तुमच्या रक्तात आयर्नची कमतरता असेल किंवा अनेमियचे शिकार तुम्ही झाला असाल तर याकरिता ही पाने आहारात घ्या.

त्यासाठी फ्लॉवरची अशी पाने घ्या जी चांगली ताजी असतील, सुकलेली आणि पिवळी पडलेली पाने अजिबात घेऊ नका. हिरव्या पालेभाजी मध्ये ह्या पानांचा वापर करू शकता.

या पानामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी लागणारे आवश्यक घटक आहेत. त्यामुळे कोणतेही आजार तुमच्यापासून लांब राहतील.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल