Home विचार या दिवसात प्रत्येकाला आपली नोकरी जाते की काय याचे जास्त टेन्शन आलेले असेल

या दिवसात प्रत्येकाला आपली नोकरी जाते की काय याचे जास्त टेन्शन आलेले असेल

by Patiljee
240 views

नोकरी करण्याची सर्वात मोठी जबाबदारी ही घरातील पुरुषावर असते. पण आताच्या काळात स्त्रिया ही नोकरी करतात. त्यामुळे नोकरीची जबाबदारी या काळात दोघांचीही आहे. असे म्हणण्यात काहीच वावगे ठरणार नाही. पण तरीही सर्वात जास्त टेन्शन हे पुरुषाला आलेले असणार. कारण तोच घराचा कर्ता पुरुष असतो. आणि सध्याच्या लॉक डाऊनच्या काळात सगळ्यात जास्त लोकांची नोकरी जाण्याची शक्यता ही आहे.

शिवाय काही लोकांच्या नोकऱ्या गेल्यात जमा आहेत. म्हणूनही टेन्शन आलेले असेलच. पण खरं तर कोणतीही गोष्ट टेन्शन घेऊन कधीच ते टेन्शन आपल्याला सोडून जात नाही. त्यामुळे आपल्या शरीराला त्याचा जास्त त्रास होत असतो. मानसिक खच्चीकरण होत असते. अशा वेळी कधीही शांत राहून विचार करा. आता जरी ही नोकरी गेली असली तरी यापुढे आपण दूसरे काहीतरी करू शकतो. तितका आत्मविश्वास आपल्यात असायला हवा. एखादी चांगली नोकरी शोधा किंवा साधा म्हणजे थोड्या भांडवलात एखादा व्यवसाय करा. पण चिंता आणि टेन्शन यापासून चार हात लांब रहा. चिंता आणि टेन्शन घेऊन आजपर्यंत कोणाचेही चांगले झाले नाही हे लक्षात ठेवा.

महत्वाचे म्हणजे सर्वात जास्त समजूतदारपना हा घरातील स्त्रियांनी यावेळी दाखवायची गरज आहे. जरी नवरा एकटा कमवणारा असला आणि एका झटक्यात त्याची नोकरी गेली असली तरी बायकोने त्याच्या पाठी खंबीर पने उभे राहण्याची गरज आहे. एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा आपल्या नवऱ्याची नोकरी होती तेव्हा आपल्या हौस मौज होत होत्या. जरी हौस मौज होत नसली तरी दोन वेळचे पोटभर जेवण मिळत होते. पण आता जर नोकरी गेली असेल तर थोडे दिवस तुम्हाला ते सहन करणे गरजेचे आहे.

आता तुम्ही तुमच्या नवऱ्याला साथ दिली तर तो शेवटपर्यंत तुम्हाला साथ देईल हे नक्की. याचबरोबर घरातील इतर सदस्यांना ही या वेळी समजून घेणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही सगळे एकत्र असणार तेव्हा कोणीच तुमचे काहीही बिघडवू शकणार नाही हे नक्की. नोकरी काय आज गेली तर उद्या नक्की मिळेल, कारण दिवस सगळे सारखेच नसतात चढ उतार सगळ्यांच्याच आयुष्यात येतं असतात आणि त्यांना सामोरे जाण्याची तयारी आपल्यात असायला हवी.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल