Home हेल्थ तुम्हालाही झोपताना हेडफोन्स किंवा ब्लूटूथ लाऊन झोपायची सवय आहे का?

तुम्हालाही झोपताना हेडफोन्स किंवा ब्लूटूथ लाऊन झोपायची सवय आहे का?

by Patiljee
130 views

हेडफोन्स लाऊन संगीत ऐकणे म्हणजे प्रत्येकाची आवड. आपण कधीही आनंदी असलो, दुखी असलो, ब्रेकअप झालं, प्रेम झालं किंवा निवांत वेळ काढायचा असेल तर आपण नेहमीच मोबाईलला हेडफोन्स जोडतो आणि आपल्या आवडीची गाणी ऐकायला सुरुवात करतो. ह्यात काहीच चुकीचे नाहीये, कारण ह्या प्रक्रियेमुळे आपला वेळ आणि मुड दोन्ही चांगले होतात. म्हणून हेडफोन्स लाऊन संगीत ऐकणे कधीही चांगले. कारण ह्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास सुद्धा होत नाही आणि आपण हवं ते संगीत ऐकू शकतो.

पण काही लोकं चुकीच्या पद्धतीने संगीत ऐकण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे ह्याचे परिणाम त्याच्या शरीरावर, रोजच्या दैनंदिन जीवनावर सुद्धा आधलून येतात. आता तुम्ही म्हणाल संगीत ऐकल्याने कसे काय दुष्परिणाम होणार. आमचे म्हणणे असे नाही की संगीत ऐकुन परिणाम होतात. आमचे म्हणणे हे आहे की लोकं चुकीच्या वेळेला हेडफोन्स वापर करून संगीत ऐकतात. त्यामुळे त्याचा त्रास होतो. कसे ते आपण पुढे पाहूया.

काहींना झोपताना कानात हेडफोन्स किंवा ब्लूटूथ टाकून झोपायची सवय असते. अशा लोकांच्या मते त्यांना असे नाही केलं तर झोपच येत नाही. आता हा त्यांचा गोड गैरसमज आहे. कारण असे केल्याने जरी त्यांना झोप येत असेल तरी ती झोप गाढ नसते. आपले शरीर जरी झोपी गेले असले तरी कानात संगीत चालू असल्याने आपला मेंदू पूर्णतः झोपलेला नसतो. त्यामुळे अशा व्यक्तींची झोप कधीच पूर्ण होत नाही.

झोपताना संगीत ऐकताना अनेकदा त्याचा तुमच्या झोपेवर परिणाम आढलुन येतो. तुमच्या मेंदूला संगीत सक्रिय असल्यामुळे आराम मिळत नाही. त्या संगीतामुळे मेंदू Active Mode मध्ये असतो.

संगीत ऐकताना तुम्ही झोपी गेला तर रात्रभर तुम्ही निवांत झोपू शकणार नाहीत. कानात संगीत वाजत असल्याने अनेकदा तुमची झोप मोड होईल. तुमच्या शरीरासाठी आवश्यक असलेली आठ ते नऊ तासाची झोप तुमची पूर्ण होऊ शकत नाही. तुम्हीही रात्री झोपताना अशा प्रकारे हेडफोन्स किंवा ब्लूटूथचां वापर करत असाल तर आताच सावध व्हा.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल