आपल्यापैकी बहुतेक जणांनी बोटे मोडणे म्हणजे याचा अर्थ काही तरी वेगळाच असा काढला आहे. पण याचा शब्द शहा अर्थ घेऊ नये. बोटे मोडणे म्हणजे कधी कधी बसल्या जागी हात सुन्न झाले किंवा हाताला रग आली किंवा हातात दुसरे काहीच काम नसेल तर काही माणसे हाताची बोटे कडा कडा वाजवतात, त्यातून येणारा आवाज ही मोठा असतो त्यामुळे त्यांच्या बोटांच्या हाडांना आराम मिळतो असे त्यांचे मत आहे. काही लोक कधीतरी करतात पण काहींना तर ही सवय लागते म्हणजे काही कारण नसताना अशी बोटे वाजवत बसतात म्हणून आज समजू घेऊ ही सवय चांगली आहे की वाईट?
तर काही लोकांना असे वाटत असते की बोटे मोडल्याने बोट मोकळी होतात आणि त्यांना आराम मिळतो पण हे चुकीचे आहे कारण यामुळे तुमच्या हाडांवर याचा परिणाम होऊ शकतो हे पहिले ध्यानात घ्या. हाताची किंवा पायाची बोटे वाजल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर याचा परिणाम होतो. त्यामुळे हळू हळू का होईना पण ही सवय सोडण्याचा प्रयत्न करा. आपल्या हाडांच्या जोईंड मध्ये एकप्रकारचा द्रव्य असते त्यामुळे आपल्या त्याला श्र्लेष द्रव असे म्हणतात या द्रव्याचा उपयोग काय असेल तर यामुळे आपल्या हाडांचे घर्षण होत नाही.
आता आपण जेव्हा बोटे वाजवत असतो तेव्हा कट कट असा जोरात आवाज येतो तो कशामुळे येतो हा विचार केलाय का कधी तुम्ही? तर या हाडांच्या जोइंड मध्ये असणारे श्र्लेष द्रव्य यामध्ये असणारे गॅस यामुळे हाडांमध्ये बुडबुडे तयार होतात तेव्हा आपण कधी बोटे मोडतो तेव्हा हे बुडबुडे फुटतात आणि तो आवाज आपल्याला येतो. आणि म्हणून दुसऱ्यांचा पुन्हा बोटे वाजल्यावर हा आवाज येत नाही कारण ते बुडबुडे तयार होण्यासाठी पुन्हा 15 ते 30 मिनिटे लागतात.
आणि म्हणून हे हाडांच्या जॉंइंड मध्ये असणारे द्रव्य आपल्या हाडांच्या हालचाली करता अत्यंत फायदेशीर आहे जर हे द्रव्य कमी झाले तर आपली हाडे एकमेकांना घासल्यामुळे तुम्हाला याचा जास्त त्रास होऊ शकतो. आपल्या हाडांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते हे लिक्विड आपल्या हाडांच्या हालचालीसाठी अत्यंत आवश्यक आहे. जर हे कमी झाले किंवा संपले तर हाडे एकमेकांना घासल्यामुळे जोडांमध्ये वेदना सुरू होतात. त्यामुळे तज्ञ सांगतात की तुम्ही हाडांना जास्त ताण दिला किंवा हाडाच्या सांध्यांना ओढले तर तुमच्या हाडांमध्ये गॅप येऊ शकतो, बोटे मोडल्यामुळे सांध्यांना हानी पोहोचते.